Sex Determination Kolhapur: कोल्हापुरात (Kolhapur News) गर्भलिंग निदान चाचण्यांचा उच्छाद सुरुच आहे. आज शहरातील राजारामपुरी परिसरातील श्री हाॅस्पिटलवर मनपाच्या आरोग्य विभागाने छापा टाकून 15 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पाच महिन्यांपूर्वी मोठे रॅकेट कोल्हापूर पोलिसांनी गर्भ निदान चाचणीचे रॅकेट उघडकीस आणले होते. त्यानंतर मनपा हद्दीत (Kolhapur Municipal Corporation) आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याची खात्रीशीर कारवाई मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आरोग्य विभागाने छापा टाकला असता श्री हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापकाला 15 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
रोख 15 हजार स्वीकारताना व्यवस्थापकाला रंगेहाथ पकडला
कोल्हापूर मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. रमेश जाधव यांच्या पथकाने श्री हॉस्पिटलवर छापा टाकला. यावेळी गर्भलिंग निदान मशीन बंद अवस्थेत भासवून गर्भलिंग निदान चाचण्या केल्या जात होत्या. आरोग्य विभागाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गर्भलिंग निदान चाचणीसाठी रोख 15 हजार रुपये स्वीकारताना व्यवस्थापकाला रंगेहाथ पकडला गेला. राजारामपुरीत पहिल्या गल्लीत श्री हॉस्पिटल डॉ. सोनल वालावलकर यांच्या मालकीचं आहे.
स्टिंग ऑपरेशनमुळे भांडाफोड
गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे मनपा आरोग्य विभागाचे डॉ. रमेश जाधव यांनी म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर यांनी एका पेशंटच्या बहिण म्हणून हाॅस्पिटलमध्ये येत स्टिंग ऑपरेशन केलं. त्यांना अंकिता आणि दिग्विजय कालेकर या दाम्पत्याची साथ मिळाली. त्यामुळे शहरातील आणखी एका रुग्णालयाचा भांडाफोड झाला आहे.
गर्भलिंग निदान चाचणीचे रॅकेट उघडकीस
दुसरीकडे, राधानगरी भुदरगड तालुक्यात गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश राधानगरी पोलिसांनी या वर्षाच्या सुरुवातीला केला होता. या प्रकरणाचा अजूनही तपास सुरु आहे. एक महिन्यापूर्वी चार फरार आरोपींपैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 17 जणांना अटक झाली आहे. जिल्ह्यात गर्भलिंग चाचणी करणारे रॅकेट उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील अजूनही दोन आरोपी फरार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या