Kolhapur Football : आगामी संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड महाराष्ट्र फुटबॉल संघात झाली आहे. देशातील संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेची (santosh trophy 2022) पात्रता फेरी प्रथमच कोल्हापूरमध्ये होणार आहे. 7 ते 15 जानेवारीला ‘ड’ गटाचे विभागीय सामने कोल्हापुरात होणार आहेत. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनकडून संयोजन करणार आहे.
पवन विजय माळी (दिलबहार तालीम मंडळ), इंद्रजीत दिनकर चौगुले ( शिवाजी तरूण मंडळ), यश नामदेव देवणे (पाटाकडील तालीम मंडळ), ऋषीकेश गणेश मेथे-पाटील (पाटाकडील ), ओंकार सुरेश पाटील (पाटाकडील) अशी महाराष्ट्र फुटबाॅल संघात निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत. हे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे (Kolhapur Sports Association) खेळाडू आहेत. दरम्यान, स्पर्धेसाठी (santosh trophy 2022) ड गटामध्ये यजमान महाराष्ट्रासह बंगाल, मध्यप्रदेश, दमण आणि दादरा, छत्तीसगढ, हरियाणा यांचा गटात समावेश आहे. संतोष ट्रॉफीसाठी सहा गटात पात्रता सामने होतील. हे सामने दिल्ली, कोझिकोड (केरळ), आसाम, भुवनेश्वर (ओडिशा) आणि कोल्हापूरचा समावेश आहे. स्पर्धेत दररोज तीन सामने होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य फुटबॉल संघ निवडीसाठी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनकडून 21 डिसेंबर ते 02 जानेवारी 2023 या कालावधीत कुपरेज फुटबॉल ग्राऊंडवर निवड चाचणी शिबीर घेण्यात आले. यामध्ये केएसएच्या 7 खेळाडूंचा समावेश होता. या सात खेळाडूंपैकी पाच जणांची निवड झाली. (santosh trophy 2022)
गट IV: पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमण आणि दादरा, हरियाणा
7 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध छत्तीसगड, कोल्हापूर
- हरियाणा विरुद्ध बंगाल, कोल्हापूर
- मध्य प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र, कोल्हापूर
9 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध बंगाल, कोल्हापूर
- छत्तीसगड विरुद्ध महाराष्ट्र, कोल्हापूर
- हरियाणा विरुद्ध मध्य प्रदेश, कोल्हापूर
11 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध महाराष्ट्र, कोल्हापूर
- बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश, कोल्हापूर
- छत्तीसगड विरुद्ध हरियाणा, कोल्हापूर
13 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध मध्य प्रदेश, कोल्हापूर
- महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा, कोल्हापूर
- बंगाल विरुद्ध छत्तीसगड, कोल्हापूर
15 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध हरियाणा, कोल्हापूर
- मध्य प्रदेश विरुद्ध छत्तीसगड, कोल्हापूर
- महाराष्ट्र विरुद्ध बंगाल, कोल्हापूर
इतर महत्वाच्या बातम्या