Kolhapur News: कोल्हापुरात (Kolhapur Fire) तीन दिवसांत दुसऱ्यांदा भीषण आगीची घटना घडली. शहरातील मध्यवर्ती परिसर असणाऱ्या शिवाजी चौकातील पाटील कोल्डिंक हाऊसजवळील तीन मजली इमारतीला आज (23 मे) सायंकाळी पावणे सहा ते सहाच्या सुमारास भीषण आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत अजून माहिती समोर आलेली नाही. मात्र, आग लागलेला दाटीवाटीचा असल्याने एकच खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दाभोळकर कॉर्नर सिग्नलजवळ एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली होती. दाभोळकर कॉर्नर परिसरात बाजीराव संकुल या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दुपारच्या सुमारास आगीचे लोट बाहेर पडताना दिसू लागले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. इमारतीला लागून असलेल्या पेट्रोल पंपावरील वाहने आणि गर्दी स्थानिकांनी हटवल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली होती.


इतर महत्वाच्या बातम्या