Hasan Mushrif ED Raid : कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील तसेच पुण्यातील निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. ईडी आणि प्राप्तीकर विभागाने एकत्रित ही कारवाई केली. हसन मुश्रीफ यांच्या मुलींच्या घरावरही छापेमारी करण्यात आली. छापेमारी सुरु असताना हसन मुश्रीफ घरी नव्हते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यांमध्ये खळबळ उडाली. गेल्या 12 तासांपासून छापेमारी सुरुच असल्याने समर्थकांनी आंदोलन करून निषेधाच्या घोषणा दिल्या. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 158 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. मुश्रीफ यांनी कोणत्या कारणावरून कारवाई झाली हे माहीत नाही, किरीट सोमय्यांनी नव्याने तेच आरोप केलेत, कारखान्याशी आणि चंद्रकांत गायकवाड यांच्याशी काही संबंध नाही, असा दावा त्यांनी केला. सोमय्यांवर दीड कोटींचे फौजदारी दावे केलेत ते न्यायप्रविष्ठ असल्याचे ते म्हणाले. 


मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कारवाईचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी या कारवाईचा निषेध केला.गेल्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने गैरव्यवहाराचे आरोप करण्यात होत होते. छापेमारी सुरू असताना स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तपास यंत्रणांनी दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त आणला होता त्यामुळे छापील आधी सुरू करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर बातमी वाऱ्यासारखी कागल शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली. 


समर्थकांनी निवासस्थानी येण्यास जमण्यास सुरुवात झाली. यावेळी पोलिसांना सुद्दा त्यांना रोखताना चांगलीच दमछाक झाली. सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणेचा गैरवापर होत वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. समर्थकांनी बॅरिकेड्स बाजूला करून निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला. कार्येकर्ते आक्रमक झाल्यानंतर मुश्रीफ यांनी एका व्हिडिओतून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी आपल्या कार्यकर्त्यांनी घ्यावी अशी विनंती त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली. 


मुश्रीफांनी आरोप फेटाळले 


दुपारी दोनच्या सुमारास मुश्रीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी सोमय्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. ब्रिक्स कंपनीचा आणि आपला काही संबंध नाही तसेच गायकवाड यांच्याशी आपली कुठलीही व्यावसायिक भागीदारी नाही. असाही त्यांनी दावा त्यांनी केला. जावयाचा आणि ब्रिक्स कंपनीच्या काहीही संबंध नाही, असेही त्यावेळी म्हणाले. जे काही पैसे आप्पासाहेब नलवडे कारखान्यांमध्ये लावण्यात आलेले पैसे सर्व हे शेतकऱ्यांचे असून शेअरच्या माध्यमातून उभा करण्यात आल्याचे सांगितले.


ब्रिक्स कंपनी आणि माझा संबंध नाही


ते पुढे म्हणाले, माझे जावई आणि ब्रिक्स कंपनी याचा काहीही संबंध नाही. ग्रामविकासाची काम रद्द केली गेली. आज झालेली छापेमारी कोणत्या मुद्दावर छापेमारी केली मला समजत नाही. कुटुंबाला त्रास नाहक होत आहे. कुटुंबिय भयभीत होत आहे. राजकारणासाठी अस केले जात आहे. ग्रामविकासाच्या कामाचं टेंडर त्यावेळेस रद्द केले. काही त्रूटी होत्या म्हणून केले. विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट केले जात आहे का? अशी शंका येते. 


ईडीकडून नोटीस समन्स काहीच नाही 


ते म्हणाले, आयकर विभागाचे छापे या आधी पडले होते. माझ्यावर सोमय्या यांनी आरोप केला, की काळा पैसा कारखाना शेल कंपनी माध्यमातून गुंतवला. कारखान्याचा पैसा शेअर्स माध्ययमातून उभा राहिला. गायकवाड यांच्याशी व्यावसायिक भागीदारी नाही. ब्रिक्स कंपनी माझी असल्याचा दावा केला जात आहे, पण त्यात तथ्य नाही. जावई आणि ब्रिक्स कंपनी संबंध नाही. ग्रामविकास काम टेंडर त्यावेळेस काही त्रूटी होत्या म्हणून रद्द केले होते. 


यंत्रणांचा वापर करून त्यांना बदनाम किंवा नामोहरम करण्याचा प्रयत्न 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ईडी कारवाईवरून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, यापूर्वीही मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आयकर विभागाची धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी काही निष्पन्न झाले नाही. आताही ईडीकडून धाड टाकण्यात आली. मात्र, विरोधी पक्षातील जे लोक सातत्याने ठामपणे सरकारविरोधात उभे राहतात, त्यांच्या विरोधात विविध यंत्रणांचा वापर करून त्यांना बदनाम किंवा नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे. 


सूडबुद्धीने कारवाई करणं चुकीचं


हसन मुश्रीफांवरील ईडी कारवाईवर  बोलताना अजित पवार म्हणाले की, सूडबुद्धीने कारवाई करणं चुकीचं आहे. ठाकरे गटातील राजन साळवी, नितीन देशमुख, वैभव नाईक यांच्यावर राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या तपास यंत्रणाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे याला राजकीय रंग आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाहक त्रास कोणाला होता कामा नये. अनिल देशमुखांवर कारवाई झाली, पण कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. संजय राऊत यांच्यासोबत देखील असेच झाले. हे सर्व प्रकार देशाला आणि राज्याला परवडणारे नाही. 


मुश्रीफांवरील ईडी कारवाई पूर्वनियोजित


आमदार सतेज पाटील यांनीही तीव्र शब्दात निषेध केला आहे. भाजपकडून मविआ आमदारांच्या मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न असून मुश्रीफांवरील ईडी कारवाई पूर्वनियोजित असल्याचा हल्लाबोल सतेत पाटील यांनी केला. पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. केवळ सूडबुद्धीने केलेली ही कारवाई निश्चित निषेधार्ह आहे.


किरीट सोमय्यांकडून कोणते आरोप?


महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केले होते. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून 158 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यामध्ये मुश्रीफ यांचे जावई आणि मुलगा सहभागी असल्याचेही त्यांनी म्हटले होते. 


1500 कोटी रुपयांचे कंत्राट  


दरम्यान, 2020 मध्ये पारदर्शक व्यवहार न होता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला. या कंपनीस साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना या कंपनीला कंत्राट का दिले? मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांनी असेही म्हटले होते की, हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना 1500 कोटींचे कंत्राट जावयाच्या बनावट कंपनीला दिले. मी पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितले. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 158 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला. 


हसन मियांचं काऊंटडाऊन सुरु


माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासोबतच ग्रामविकास खात्याचे सचिव राजेश कुमार मिना यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. एकूण 158 कोटींचा घोटाळा हसन मुश्रीफ यांनी केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी बोलताना केला. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुश्रीफांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे. 
भाजप नेते किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की, "ठाकरे यांच्या माफिया सरकारमधील आणखी एक मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आता ईडीची कारवाई सुरू झाली. 158 कोटी रुपये हसन मुश्रीफ यांनी स्वतःच्या कुटुंबीयांच्या, मुलाच्या आणि जावयाच्या कंपनीच्या नावानं घोटाळ्याचे पैसे कोलकात्याच्या अनेक बोगस कंपन्यांमधून स्वतःच्या कुटुंबीयांच्या कंपनीत घेतले. त्यानंतर ते पैसे सर सेनापती घोरपडे साखर कारखान्यात ट्रान्सफर केले."


समर्थकांचे आंदोलन 


हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांकडून छापेमारीनंतर कागलसह कोल्हापुरातही आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरात समर्थकांनी किरीट सोमय्या यांचा पुतळा जाळताना निषेधाच्या घोषणा  ि


 


इतर महत्वाच्या बातम्या