Satej Patil and Amal Mahadik, Kolhapur : कोल्हापुरातील काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil ) आणि भाजपात असलेलं महाडिक घराणं एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. गेल्या काही निवडणुका पाहिल्या तर काँग्रेस आमदार सतेज पाटील विरुद्ध भाजप आमदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) असंच कोल्हापूरच्या राजकारणाचं (Kolhapur Politics) चित्र राहिलंय. मात्र, आज सतेज पाटील (Satej Patil ) आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक (Amal Mahadik ) एकत्र आलेले पाहायला मिळाले आहेत. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात...
महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये पहिल्यांदाच एकमत
महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये पहिल्यांदाच एकमत झाल्याचं पाहायला मिळालंय. आमदार अमल महाडिक आणि आमदार सतेज पाटील दोघांनी एकत्र येत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. कोल्हापूर विमानतळाजवळचा उजळाईवाडी ते तामगाव रस्ता बंद करण्यात आलाय. त्यामुळे पर्यायी रस्ता तातडी करण्यात यावा, अशी मागणी सतेज पाटील आणि अमल महाडिक यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.
यावेळी सतेज पाटील यांनी ऋतुराज पाटील यांचा फंड रस्त्याला दिल्याची माहिती आहे. तर विद्यमान आमदार अमल महाडिक यांनीही आपली बाजूही मांडली आहे. दरम्यान, अमल महाडिक आणि सतेज पाटील हे एकत्र आल्याने चर्चेला उधाण आलंय.
कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या महाडिक आणि पाटलांमध्ये पहिल्यांदाच एकमत झाल्यानंतर सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांना मोठा धक्का बसला होता. कोल्हापूर जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिली होती. कोल्हापुरातील 10 पैकी 10 जागांवर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता.
सतेज पाटलांना मोठा धक्का, कट्टर समर्थकाने साथ सोडली
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेस उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर महायुतीमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे. सतेज पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रंगधर देशमुख हे काही दिवसातच शिंदे गटांमध्ये प्रवेश करणार असल्याच बोललं जातंय. मी सतेज पाटलांना सोडलंय, असं शारंगधर देशमुख (Sharangdhar Deshmukh) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे सतेज पाटलांना मोठा धक्का मानला जातोय. शारंगधर देशमुख लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या