Satej Patil: गेल्या अनेक दिवसांपासून आग लागून धुमसत असलेल्या कोल्हापुरातील (Kolhapur news) कसबा बावड्यातील झूम कचरा प्रकल्पावरून आमदार सतेज पाटील यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी लागलेली आग तातडीने आटोक्यात आणावी. तसेच केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करा, अन्यथा या ठिकाणी कचरा टाकायचा बंद न केल्यास स्वतः थांबून कचऱ्याची वाहने रोखणार असल्याचा इशारा आमदार पाटील यांनी दिला. सतेज पाटील कोल्हापूर महापालिका अधिकाऱ्यांसोबत कचरा प्रकल्पाची पाहणी केली. सोमवारी 29 मे रोजी पुन्हा झूम प्रकल्पाची पाहणी करून मंगळवारी महापालिका प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत आढावा बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


कचऱ्याला लागलेली आग ताबडतोब आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा स्प्रिंकलर टँकर लावावा. जादा मनुष्यबळ ठेवा, सफाईसाठी महानगरपालिकेने पाच ते सहा कर्मचारी या ठिकाणी कायमस्वरूपी नेमावेत, झूम प्रकल्पाच्या बाजूने झाडे लावून या ठिकाणी लॉन करा शिवाय बाहेरच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून वॉचमनची नेमणूक करा आदी सूचना आमदार पाटील यांनी केल्या. यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ, आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, उपशहर अभियंता रमेश कांबळे, अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, माजी नगरसेवक संदीप नेजदार, माजी नगरसेवक राजेश लाटकर, सागर येवलुजे, संजय लाड आदी उपस्थित होते.


प्रकल्पातील धुमसती आग


कसबा बावड्यातील झुम प्रकल्पातील कचऱ्यातून धूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. गेल्या आठवड्यापासून कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्याला लागलेली आग अजूनही धुमसत आहे. कचऱ्यातून धूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. गेल्या आठवड्यापासून कचऱ्याला लागलेली आग मोठी भडकली होती. धुरामुळे शेजारील रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. नागरिकांचेही आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाल्याने अग्निशमन दलाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. गेल्या काही दिवसांपासून धुमसणाऱ्या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत आहे. त्याचा वास तीव्र असून, परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. एक आठवड्यापूर्वी लागलेल्या आगीवर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रभर प्रयत्न करून आटोक्यात आणली होती.


इतर महत्वाच्या बातम्या