Rohit Pawar : पेन, पेपर घ्या आणि आजच्या आज राष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा द्या, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर तोफ डागली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पदमुक्त करावे, अशी इच्छा पत्र पाठवून व्यक्त केली आहे. यानंतर राज्यात राज्यपाल बदलाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राज्यात पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. ते येत असतील, तर आताच्या राज्यपालांपेक्षा बरे असतील असे ते म्हणाले. नवीन येणारे राज्यपाल नक्कीच यांच्यापेक्षा चांगले असतील अशी आशा असल्याचेही त्यांनी नमूद केले. 


रोहित पवार पुढे म्हणाले, अनेक निवडणुकांमध्ये भाजप पिछाडीस जात आहे. मुंबईसाठी भाजपने एवढा मोठा पक्ष फोडला. केवळ चिन्हासाठी वेळ काढला जात आहे. भाजपची पिछेहाट होत असल्याने निवडणूक होत नाही. लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता आहे 


'महाराष्ट्र व्हिजन फोरम'साठी राज्यभरातून तरुणांचा मोठा प्रतिसाद


'महाराष्ट्र व्हिजन फोरम'साठी रोहित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, 'महाराष्ट्र व्हिजन फोरम'साठी राज्यभरातून तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत 1 लाख लोकांनी मतदान केलं असून 24 हजार लोकांनी सल्लाही दिला आहे. यामधून व्हीजन डाॅक्युमेंट आम्ही सरकारला देणार आहे. फेब्रुवारी अखेरीस 10 लाख मतदान होईल. हा प्रकल्प ऑनलाइन सुरू केला. आता महाविद्यालयातही हा प्रकल्प सुरू केला आहे. हा अराजकीय प्लॅटफॉर्म आहे, आम्ही दिलेल्या डॉक्युमेंटवर सरकारने काम करावं. 


देशात काहीही झालं तर पवारांनी केलं, अस वातावरण


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत रोहित पवार यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, या विषयी खरं काय घडलं ते अजितदादा आणि शरद पवार साहेब सांगू शकतील. बावनकुळे यांनी राजकीय मुद्दा मिळला म्हणून खुश राहू नये. बावनकुळे यांची वैचारिक बैठक कळते. शरद पवारांवर बोलताना बावनकुळे यांनी पंतप्रधानांना विचारावं, मगच टीका करावी. 


बाहेर गेलेल्या प्रकल्पांना महाराष्ट्रासाठी परवानगी दिली गेली होती. इतर राज्यासाठी नाही, त्यामुळे ते प्रकल्प अजून सुरू झाली नाही. डाओसला जाऊन जे करार झाले ते जुनेच असल्याचेही त्यांनी सांगितले. 


महत्वाच्या इतर बातम्या :


Shivsena VBA Andolan in Kolhapur : पालकमंत्री केसरकर चले जाव! शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीनंतर पहिलं एकत्रित आंदोलन कोल्हापुरात