Raju Nerlekar Kolhapur scam: कोल्हापूरचा हर्षद मेहता अर्थात राजू नेर्लेकरच्या (Raju Nerlekar Kolhapur scam) अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. कोल्हापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Kolhapur Police) कारवाई करत गेल्या दोन वर्षापासून चकवा देणाऱ्या राजू नेर्लेकरला अटक केली आहे. गुंतवणुकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवत कोल्हापूरसह दक्षिण भारतात अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा राजू नेर्लेकरनं घातला आहे. गेल्या दोन वर्षापासून तो कोल्हापूर पोलिसांना चकवा देत होता. गुन्ह्याची व्याप्ती पाहून एबीपी माझाने राजू नेर्लेकरवर कारवाई करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
कोण आहे राजू निर्लेकर? (The Main Accused: Raju Nirlekar)
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीचा राजू नेर्लेकर हा कोल्हापूरचा 'हर्षद मेहता' झाला होता. तो जेमतेम शिक्षण असलेला व्यक्ती आहे. त्याने गोड बोलून अनेकांना गुंतवणूक करण्यास भुरळ पाडली. त्यासाठी त्याने वेगवेगळ्या नावानं बोगस कंपन्या स्थापन केल्या. पहिले दोन महिने जादा परतावा देऊन गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर खरा खेळ सुरू झाला. त्याने इतर राज्यातील देखील गुंतवणूकदार तयार केले होते. शेतकरी, लहान उद्योजक, महिला यांना गोड बोलून त्याने फसवलं आहे. या फसवणुकीचा आकडा हजारो कोटींच्या घरात आहे. यामुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. जादा परतावा मिळण्याच्या लालसेनं अनेकांनी कोट्यवधी रुपये गुंतवले. मात्र त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली असून अनेकांना आयुष्य नको झालं आहे. पैसे परत मिळवण्यासाठी नागरिक सकाळी पहाटे उठून त्याच्या दारात जाऊन बस होते.
बिटकॉइन करन्सीच्या धर्तीवर स्वत:ची झिप करन्सी स्थापन
राजूने हुपरीमध्ये घोरपडे कॉम्प्लेक्समध्ये आलिशान ऑफिस सुरू केले होते. या माध्यमातून परिसर व राज्याबाहेरील शेकडो जणांना केवळ दोन वर्षांच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा चुना लावून हा उद्योग बंद केला. त्यानंतर 2017 मध्ये त्याने बिटकॉइन करन्सीच्या धर्तीवर स्वत:ची झिप करन्सी (Zip currency scam Maharashtra) नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीची महाराष्ट्र, गोवा व गुजरातमध्ये विविध ठिकाणी आलिशान ऑफिस उघडून गोड बोलत शेकडो जणांना फसविले.
इतर महत्वाच्या बातम्या