Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखाना (Rajaram Sakhar Karkhana) निवडणुकीत अर्ज दाखल करतानाही सतेज पाटील (Satej Patil) आणि सत्ताधारी महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) गटाकडून जोरदार चुरस दिसून आली. त्यामुळे शाब्दिक बाचाबाची सुद्धा झाली. कारखान्यासाठी दाखल झालेल्या 237 उमेदवारी अर्जांपैकी 33 अर्जांवर हकरती घेण्यात आल्या आहेत. यामधील 10 उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. 23 उमेदवारी अर्जांवरील हकरतीमध्ये पात्र-अपात्र ठरलेल्या उमदेवारांचा निकाल आज (29 मार्च) कारखान्याच्या नोटीस बोर्डवर आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे यांनी दिली. 


गट क्रमांक एक, तीन, पाचमध्ये प्रत्येकी 1 असे, गट क्रमांक सहामध्ये 6 व इतर मागासमधून 1 असे एकूण 10 उमदेवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. एका उमेवाराने संस्था गटाचा ठराव असताना त्यांनी इतर मागास प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज या गटातून अपात्र ठरविण्यात आला आहे.


अर्ज छाननीवेळी सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये शाब्दिक बाचाबाची


राजाराम कारखान्याच्या अर्ज छाननीवेळी सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे सुद्धा प्रकार घडले. बनावट अर्ज करुन विरोधी उमेदवारांवर हरकत घेतली असा आरोप आमदार सतेज पाटील गटाकडून, तर विरोधकांकडून हकरतदारांवर दबाव टाकला जात असल्याची भूमिका महाडिक गटाने घेतली. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘राजाराम कारखान्याच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यामध्ये साखर कारखान्याच्या करारानूसार ऊस पुरवठा झालेला नाही. सूचक, अनुमोदक हे कोणत्या तरी संस्थेचे थकबाकीदार आहेत, असे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. ही छाननी तीन टप्प्यात घेण्यात आली. यामध्ये 4 उमेदवारी अर्जामध्ये उमेदवार, सुचक व अनुमोदक यांनी अपेक्षित ऊस पुरवठा केलेला नाही. तसेच थकीत कर्जदार आहेत. त्यामुळे चार उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. आज अधिकृत घोषणा केली आहे.  


दरम्यान, सर्वसाधारण गटातील 15, महिला प्रतिनिधी गटातील 2 तर संस्था प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि भटक्या विमुक्त गटातील प्रत्येकी एक अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. संस्था गटाचे 129 तर 13409 अ वर्ग सभासद असे 13538 सभासद मतदानासाठी पात्र आहेत. निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार, 12 एप्रिल हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. 


इतर महत्वाच्या बातम्या