Rajaram Sakhar Karkhana Result Update: राजाराम कारखान्याच्या निकालाची उत्सुकता शिगेला
Rajaram Sakhar Karkhana: कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.. या निकालाचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: जवळपास 400 ते 500 मतांनी महाडिक गटाचे उमेदवार दुसऱ्या फेरीमध्येही आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत महाडिक गटाच्या सर्व उमेदवारांनी जवळपास 800 ते 900 मतांनी आघाडी घेतली होती.
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांना विजयी गुलाल लागला आहे. महादेवराव महाडिक यांना 83 मते मिळाली. विरोधी उमेदवार सचिन पाटील यांना 44 मतं मिळाली. राजाराम कारखाना निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी तगडे आव्हान निर्माण करूनही महादेवराव महाडिकांची सरशी झाली आहे. कारखानाच्या नऊपैकी सहा गटातून महाडिक गटाने बाजी मारली आहे. सरासरी अडीच हजार मतांनी उमेदवार आघाडीवर आहेत.
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: राजाराम साखर कारखाना निवडणूक
- पहिल्या फेरीतील पाचव्या गटात देखील महाडिक आघाडीवर
सत्ताधारी महाडिक गट
- दिलीप यशवंत उलपे - 3200
- नारायण बाळकृष्ण चव्हाण - 3130
विरोधी बंटी पाटील गट
- विजयमाला विश्वास नेजदार - 2375
- मोहन रामचंद्र सालपे - 2302
राजाराम साखर कारखाना निकाल : पहिल्या फेरीतील तिसऱ्या गटातही महाडिक गट आघाडीवर
तिसऱ्या गटात साधारण 900 ते 1000 मतांची आघाडी
गट क्रमांक 3 : सतेज पाटील पॅनल
- गायकवाड बळवंत रामचंद्र (आळवे, ता पन्हाळा) - 2158
- पाटील विलास शंकर ( भुये, ता करवीर ) - 2068
- माने विठ्ठल हिंदुराव ( वडणगे, ता करवीर) - 2361
महाडिक पॅनेल
- डॉ. किडगावकर मारुती भाऊसो - 3129
- जाधव विलास यशवंत - 2934
- पाटील सर्जेराव कृष्णा - 3051
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: राजाराम साखर कारखाना निवडणूक निकाल
- पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गट आघाडीवर
- दुसऱ्या गटातील दोन उमेदवार 900 च्या मतांनी आघाडीवर
- तर माजी आमदार अमल महाडिक हे 1 हजार मतांनी आघाडीवर
उत्पादक गट क्रमांक 2 उमेदवार
सत्ताधारी महाडिक गट
- शिवाजी रामा पाटील 3198
- सर्जेराव बाबुराव भंडारे 3173
- अमल महादेवराव महाडिक 3358
विरोधी सतेज पाटील गट
- शिवाजी ज्ञानू किबिले 2261
- दिलीप गणपतराव पाटील 2328
- अभिजीत सर्जेराव माने 2184
गट क्रमांक 1 फेरी क्रमांक 1 (सतेज पाटील पॅनेल)
- बेनाडे शालन बाबुराव (रुई) - 2441
- भोसले किरण बाबासो (रूकडी) - 2413
----------
सत्ताधारी महाडिक पॅनेल
- भोसले विजय वसंत - 3244
- मगदूम संजय बाळगोंडा - 3169
राजाराम कारखान्याच्या मतमोजणीला प्रारंभ झाला असून पहिल्या फेरीत महाडिक गटाने 700 मतांची आघाडी घेतली आहे. पहिल्यांदा हातकणंगले तालुक्यातील मतमोजणी होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या 29 आणि दुसऱ्या टप्प्यात पुढील 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी होणार आहे. सर्वाधिक चुरस असलेल्या संस्था गटातील मतमोजणी दुपारनंतर पार पडणार आहे.
राजाराम साखर कारखाना निकाल : अवघ्या कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या राजाराम कारखान्यावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांची गेल्या 28 वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. विरोधी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील यांनी सत्तांतर करण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. त्यामुळे सभासद गुलाल उधळण्याची संधी नेमकी कोणाला देणार? याचे उत्तर दुपारपर्यंत मिळणार आहे.
राजाराम कारखाना निकाल : राजाराम कारखान्याच्या मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. छानणी प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. दोन फेरीमध्ये 29 टेबलवर मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 29 आणि दुसऱ्या टप्प्यात पुढील 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी होणार आहे. सर्वाधिक चुरस असलेल्या संस्था गटातील मतमोजणी दुपारनंतर पार पडणार आहे.
राजाराम कारखाना निकाल अपडेट : राजाराम कारखान्यासाठी आज मतमोजणी होत आहे. स्ट्राॅग रुममधून मतपेट्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. यानंतर छानणी प्रक्रिया सुरु आहे. छानणी पार पडल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. दोन फेरीमध्ये 29 टेबलवर मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 29 आणि दुसऱ्या टप्प्यात पुढील 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी होणार आहे.
राजाराम कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु करण्यात आली आहे. स्ट्राॅग रुममधून मतपेट्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. पहिल्यांदा हातकणंगले तालुक्यातील मतमोजणी होणार आहे.
Rajaram Sakhar Karkhana : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर शहरातील कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निकाल आज (25 एप्रिल) लागणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजी सुरु झाली आहे.
कशी होणार मतमोजणी?
मतमोजणी बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात होईल. सकाळी आठ वाजल्यापासून दोन फेरीमध्ये 29 टेबलवर मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 29 आणि दुसऱ्या टप्प्यतात पुढील 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी होणार आहे. पहिल्यांदा मतमोजणी हातकणंगले तालुक्यातील गावांपासून होणार आहे. त्यानंतर इतर गावांची क्रमाने होईल. संस्था गटातील मतमोजणी दुसऱ्या फेरीत होणार आहे. संपूर्ण मतमोजणी झाल्याशिवाय अंतिम निकाल जाहीर केला जाईल.
पार्श्वभूमी
Rajaram Sakhar Karkhana: संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर शहरातील कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा निकाल आज (25 एप्रिल) लागणार आहे. कारखान्यासाठी रविवारी अत्यंत चुरशीने 91.12 टक्के मतदान झाले. सभासदांना मतदानासाठी घेऊन येताना दिलेल्या राजेशाही थाट तसेच साम, दाम, दंड भेदचा झालेला यथेच्छ वापर यामुळे कौल कुणाला मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या निवडणुकीसाठी विरोधी सतेज पाटील आणि सत्ताधारी महाडिक गटाकडून सर्वस्व पणाला लावून मैदानात होते. महाडिक गटाच्या ताब्यात सध्या एकमेव कारखाना असल्याने हा निकाल बरंच काही सांगून जाणारा असेल, यात शंका नाही. दोन्ही गटाकडून या निकालातून आगामी सर्व निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल, हे सुद्धा नव्याने सांगण्याची गरज नाही.
मतदानाचा टक्का वाढला.
राजाराम कारखान्यासाठी अत्यंत चुरशीने प्रचार झाला होता. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून राजकीय धुळवडीत अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब मतदानातही दिसून आला. कारखान्यासाठी मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला झटका आणि कोणाला दिलासा देणार? याचीही उत्सुकता आहे. राजाराम कारखान्याची मागील निवडणूक 2015 मध्ये पार पडली होती. त्यावेळी 90 टक्के मतदान झाले होते. सत्ताधारी पॅनेलने सर्व जागा जिंकल्या होत्या.
कशी होणार मतमोजणी?
दरम्यान, मतमोजणी बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात होईल. सकाळी आठ वाजल्यापासून दोन फेरीमध्ये 29 टेबलवर मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 29 आणि दुसऱ्या टप्प्यतात पुढील 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी होणार आहे. राजाराम साखर कारखान्याच्या संस्था गटातील एक व अन्य गटातील 20 अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत. विरोधी आमदार सतेज पाटील परिवर्तन पॅनेलचे 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीत चुरस टोकाला गेली आहे. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
मतदानाचा टक्का वाढला
राजाराम कारखान्यासाठी अत्यंत चुरशीने प्रचार झाला होता. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून राजकीय धुळवडीत अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब मतदानातही दिसून आला. कारखान्यासाठी मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला झटका आणि कोणाला दिलासा देणार? याचीही उत्सुकता आहे. राजाराम कारखान्याची मागील निवडणूक 2015 मध्ये पार पडली होती. त्यावेळी 90 टक्के मतदान झाले होते. सत्ताधारी पॅनेलने सर्व जागा जिंकल्या होत्या
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Rajaram Sakhar Karkhana : राजाराम कारखान्यासाठी ईर्ष्येने सायंकाळी चारपर्यंत 90 टक्के मतदान; सभासदांचा कौल कुणाला? उत्सुकता शिगेला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -