Kolhapur News : प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे कोल्हापूरमधील रेल्वे फाटक बंद होणार आहे. या मार्गावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामाला गती आली असून 31 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 


रेल्वे स्थानकावरील सध्याच्या तीन प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर आणखी एक नवीन प्लॅटफॉर्म उभारला जात आहे. विस्तारीकरणानंतर डब्यांपर्यंतच्या गाड्या उभ्या राहू शकतील. प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचा असेल. या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणामुळे रेल्वे फाटकातून होणारी नागरिकांची ये-जा पूर्णपणे बंद होणार आहे. यामुळे रेल्वेकडून हे फाटक बंद करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत त्याची कार्यवाही होईल. 


या परिसरात सध्या वेगाने काम सुरू असून प्लॅटफॉर्म बांधणीसाठी आवश्यक भर टाकण्यात आली आहे. त्यानुसार बांधकाम आणि रूळ टाकण्याचेही काम सुरू आहे. या फाटकासमोरच प्लॅटफॉर्म असल्याने त्यावर चढून पुन्हा रुळावर खाली उतरून पुन्हा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर चढून पुन्हा खाली उतरून नागरिकांना ये-जा करणे शक्य नाही. रेल्वे प्रशासनही तशी परवानगी देण्याची शक्यता नाही. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपूरी मार्गावरील पादचाऱ्यांना त्रास होणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या