Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता प्रशांत कोरटकर तातडीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे. प्रशांत कोरटकरला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याचा जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. आता प्रशांत कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढणार की जामीन मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) तेलंगणातून अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर मंगळवारी (25 मार्च 2025) कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर 28 मार्चला कोरटकरला पुन्हा एकदा कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आले. 

कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

यावेळी न्यायालयाने प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर प्रशांत कोरटकर तातडीने जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल करणार आहे. जामिनासाठी अर्ज केल्यानंतर या प्रकरणात सुनावणी होणार असून प्रशांत कोरटकरला जामीन मिळणार की न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

कोरटकर झाला होता न्यायालयात हल्ला 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी पोलिसांना जवळपास महिन्याभराचा कालावधी लागला होता. कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली. शुक्रवारी कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आले होते.  न्यायालयात 40 ते 45 मिनिटं युक्तिवाद झाला. त्यानंतर कोरटकर न्यायालयातच न्यायमूर्तींच्या आदेशाची वाट पाहत थांबला होता. न्यायाधीशांनी त्याची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवली. यानंतर पोलीस त्याला घेऊन गेले. न्यायालयाच्या मागच्या दाराने त्याला बाहेर नेले जात होते. त्यावेळी वकिल अमितकुमार भोसले यांनी कोरटकरवर हल्ला केला. न्यायालयाचा मागील दरवाजा कँटिनच्या दिशेने उघडतो. तिथे वकील अमितकुमार भोसले आधीपासूनच उभे होते. कोरटकर दिसताच त्यांनी त्याला हाक मारली. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का? असा सवाल विचारत भोसले कोरटकरवर धावून गेले. त्यांनी कोरटकरवर झडप घातली. यानंतर पोलसांनी अमितकुमार भोसले यांना दूर केले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Karuna Sharma : धनंजय मुंडे अन् तुमच्या नात्याबद्दल, सोबत राहण्याबद्दल गोपीनाथ मुंडेंना माहिती होतं का? पहिल्यांदा कसे भेटले? करूणा शर्मांनी सांगितली A टू Z स्टोरी

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींकडून संघाच्या स्मृती मंदिरासह दिक्षाभूमीला वंदन; उपराजधानी नागपूरात जल्लोषात स्वागत