Kolhapur News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राजेश पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे. मात्र, या प्रवेशापूर्वीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कोल्हापूरमध्ये पी एन पाटील गट आणि चंद्रदीप नरके गट हे पारंपरिक राजकीय शत्रू आहेत. राजेश पाटील महायुतीमधील राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. महायुतीमध्ये मी सहभागी होत असलो तरी 2029 विधानसभा निवडणूक लढवणारच आहे. याबाबत आम्ही अजितदादा पवार यांच्या कानावर घातलं आहे, असं राहुल पाटील यांनी म्हटल्यानंतर आमदार चंद्रदीप नरके यांनी राजेश पाटील यांची कानउघाडणी केली आहे.
पाटील आणि नरके हे एकमेकांचे मित्र म्हणून पाहायला मिळतील
महायुतीमधील कोणत्याही पक्षात कुणाचाही प्रवेश होत असेल तर मी त्याचे स्वागतच करणार आहे. मात्र, महायुतीत येताना संघर्षाची भाषा करणं योग्य नाही. अजून विधानसभा निवडणुकीला खूप वेळ आहे. त्यावेळी राजकीय समीकरण कसे असेल याची माहिती कुणाला नाही, त्यामुळे राहुल पाटील यांनी असली वक्तव्ये टाळावीत असं नरके यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत बोलताना भविष्यात पाटील आणि नरके हे एकमेकांचे मित्र म्हणून पाहायला मिळतील, असे सांगितलं. मतदारसंघाची फेररचना होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात साधारण तीन मतदारसंघ वाढतील अशी शक्यता आहे. त्यामुळे नरके आणि पाटील हे एकमेकांचा प्रचार करताना देखील पाहायला मिळतील असं मुश्रीफ म्हणाले.
अजित पवार समज देतील
चंद्रदीप नरके म्हणाले की, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचे अधिकार आहेत, राहुल पाटील यांच्यामुळे महायुतीलाच ताकद मिळणार आहे. त्यांची अडचण आम्हाला काहीच नाही. महायुतीत येण्यापूर्वी त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. भविष्यात होणाऱ्या राजकारणावर आत्ताच बोलायला नको. त्यांना मी पारंपारिक विरोधक वाटतोय हा त्यांचा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांना समज देतील. महायुती म्हणून सर्व निवडणुकांना यापुढे सामोरे जाणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, जिथं शक्य आहे तिथे एकत्र जिथे शक्य नाही तिथं स्वतंत्र लढण्याचा विचार झाला आहे. स्थानिक परिस्थितीचा अहवाल आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना देऊ. मात्र, राहुल पाटील यांचं अशा पद्धतीचे वक्तव्य म्हणजे महायुतीला बाधा आणण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. विरोधी आघाडीला पोषक वातावरण करून देण्यापेक्षा त्यांनी संयमाने घ्यावे, असे ते म्हणाले.
आहे त्यांनी महायुतीसाठी काहीतरी करावे
माझ्या मतदारसंघातील सभासद त्यामध्ये आहे तो कारखाना जिवंत राहिला पाहिजे ही माझी भूमिका आहे. राहुल पाटील आता आमच्या महायुतीमध्ये आहेत, त्यांना निंदक कसे म्हणणार? माझ्या गुड बुकमध्ये येण्यासाठी त्यांनी महायुतीमध्ये चांगले काम करावे. आमच्या पक्षात निंदक होणे चुकीचा आहे त्यांनी महायुतीसाठी काहीतरी करावे आणि अशी वक्तव्य टाळावीत. गोकुळमधील भूमिकेवर ते म्हणाले की, तत्कालीन परिस्थिती वेगळी होती, त्यानुसार तो निर्णय झाला होता. आता महायुतीतील परिस्थिती वेगळी आहे. महायुती म्हणून गोकुळच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत त्यामध्ये महाडिक देखील असणार असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या