Kolhapur Pakistani Citizen Reaction: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. भारतात असणाऱ्या सर्व पाकिस्तानी  नागरिकांना भारत सोडण्यास सांगण्यात आलंय. दिलेल्या मुदतीत जर पाकिस्तानी देशात सापडला तर त्याला 3 वर्षांचा तुरुंगवास, 3 लाख रुपयांचा दंड अशा कठोर कारवाया करण्यात येणार आहेत. दरम्यान, पाकिस्तानात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून 20 वर्षांपूर्वी भारतात कोल्हापुरात वास्तव्यास आलेल्या अशोक कुमार सचदेव यांनी  भारत आपला प्रदेश असल्याचं मानलंय. आता शेवटचा श्वासही याच देशात घेणार असल्याचं म्हणत पाकिस्तानचं पाणी रोखलं,आर्थिक कोंडी अशी जी काही कारवाई भारत सरकार करत आहे ती स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रीया पाकिस्तानी नागरिक अशोक कुमार यांनी ABP माझा'ला दिलीय. पाकिस्तानातील हिंदूंना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आधार दिल्याचं सांगत त्यांनी आभारही मानले आहेत. (Pahalgam Terror Attack)

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने भारतातील सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस जारी केली .  भारताने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे .(Pakistan)

पाकिस्तानी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामुळे भारतात आले

पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याने 20 वर्षांपूर्वी सचदेव कुटुंब पाकिस्तानातून भारतात राहायला आलं . अशोक कुमार सचदेव सध्या कोल्हापुरात राहतात .पाकिस्तानी नागरिक असणारे अशोक कुमार पाकिस्तानात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून भारतात वास्तव्यास आले .गेल्या वर्षांपासून ते कोल्हापुरात राहतात . भारतालाच आता त्यांनी आपला 'मुल्क ' मानलंय .पहलगाम हल्ल्यानंतर  पाकिस्तानचे पाणी रोखणं, पाकिस्तानाची आर्थिक कोंडी होत असताना या कारवाया करायलाच पाहिजे तर अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी नागरिक अशोक कुमार सचदेव यांनी व्यक्त केली आहे .दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 61 पाकिस्तानी नागरिक राहत असून .58 हिंदू नागरिक व तीन मुस्लिम महिला यांचा समावेश आहे .

काय म्हणाले अशोक कुमार सचदेव?

20 वर्षांपूर्वी म्हणजे 2004 साली आम्ही पाकिस्तान सोडून भारतात राहायला आलो .सध्या पाकिस्तान विरोधात सुरू केलेली भारत सरकारच्या मोहिमेची मला पूर्ण कल्पना आहे .ही कारवाई पाकिस्तान विरोधात केलीच पाहिजे असं अशोक कुमार सचदेव म्हणाले .पाणी बंद केले आर्थिक कोंडी केली हे सगळं करायलाच हवं .त्यांना धडा शिकवायलाच पाहिजे .आम्ही भारताला आमचा मुलुख मानतो .आणि मानत राहू .भारत हाता आमचाच प्रदेश आहे .शेवटच्या श्वासापर्यंत भारतासाठीच लढू .अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझा ला दिली.

हेही वाचा: