Kolhapur News : करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या पूजेतील महत्त्वाचा विधी असणारा कुंकुमार्चन सोहळा आज आयोजित करण्यात आला आहे. आज श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सोहळा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये हजारो महिला भक्तीभावाने सहभागी होत असतात. 


अंबाबाई मंदिरात देवस्थानतर्फे देवीचा कुंकुमार्चनविधी संपन्न होतो. त्यास महिलांचा मोठा प्रतिसाद लाभतो. यासाठी हजारो महिलांची या विधीसाठी समितीकडे नाव नोंदणी होते. जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घेता यावा, यासाठी समितीतर्फे प्रयत्न केले जातात. विविध उपासनांमध्ये कुंकुमार्चन ही सुख व सौभाग्यदायक उपासना आहे. विविध सौभाग्यालंकार घालून आलेल्या महिला अतिशय मनोभावे ही उपासना करतात. 


इतर महत्त्वाच्या बातम्या