Ambabai Mandir Navratri : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पंचमीला आज करवीर निवासिनी अंबाबाईची ललित पंचमीला गजारुढ रुपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा गजानन मुनीश्वर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली. आज अश्विन शुद्ध पंचमी दिवस कोल्हापूरकरांसाठी त्र्यंबोली पंचमी म्हणून ओळखला जातो. अंबाबाईने याच दिवशी कोल्हासूराचा वध केला होता. अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात ललित पंचमीला विशेष महत्व आहे.
ललित पंचमीला फोडला जाणारा कोहळा हे कोल्हासूराच्या मस्तकाचं प्रतीक करवीर महात्म्य ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे प्रथम त्याची पूजा केली जाते. त्याला घुगऱ्या, नैवेद्य दाखवून वस्त्र घातली जातात. हा कोहळा फोडून त्याचे तुकडे भूत, राक्षस, यक्ष, वेताळ यांनी घ्यावे आणि कोल्हापूरच्या सर्व पीडांपासून रक्षण करावे, अशी जगदंबेची आज्ञा आहे.
या कोहळ्यावर आज अश्विन शुद्ध पंचमी आजचा दिवस कोल्हापूरकरांसाठी त्र्यंबोली पंचमी म्हणून ओळखला जातो. अंबाबाईने याच दिवशी कोल्हासूराचा वध केला. त्यावेळी तिने वर दिला की दरवर्षी मी तुझ्या नावाने कोहळा बळी देईन आणि या नगराला तुझे नाव असेल.
पुढे कामाक्ष नावाच्या कोल्हासुराच्या नातवाने कपिल मुनींकडून योगदंड मिळवला. त्याच्या प्रभावाने त्याने अंबाबाईसह सर्व देवांचे रूपांतर बकऱ्यांमध्ये केले. हे कळताच त्र्यंबोलीने कामाक्षाचा वध केला आणि सर्व देवांची सुटका केली, पण ते त्र्यंबोलीचे आभार मानायचे विसरून गेले. त्यामुळे त्र्यंबोली रागाने शहराबाहेर टेकडीवर जाऊन बसली. तिची समजूत घालायला स्वतः अंबाबाई तिथे गेली व आजही तो भेटीचा सोहळा होतो. या भेटी करताच अंबाबाई आज गजारूढ रूपात सजली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या