Hasan Mushrif on Gokul : 'गोकुळ'मध्ये (Gokul) चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी निर्णयाचे स्वागत असल्याचे म्हटले आहे. मुश्रीफ पुढे म्हणाले, गोकुळमध्ये खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, यांच्या गटाचे संचालक असतानाही गोकुळमध्ये चाचणी लेखापरीक्षण लागत असल्यास त्या निर्णयाचे स्वागत आहे. मुश्रीफ पुढे म्हणाले की, गोकुळ निवडणुकीत दूध दरात दोन रुपयाची दरवाढ करू अशी आम्ही घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात आठ रुपये दरवाढ देण्यात आली आहे. प्रति लिटरला चारपट दरवाढ देण्यात आली.  


गेल्या दीड वर्षांपासून अतिशय काटकसरीने आणि पारदर्शक कारभार सुरू आहे. गोकुळमधील उपपदार्थांमध्ये फायदा होत नव्हता. सध्या मात्र कोट्यवधी रुपयांचा फायदा होत आहे. खर्चावर सर्व बाजूंनी मर्यादा घालण्यात आली आहे. पारदर्शी आणि  काटकसरीने संघ फायद्यात आल्याचे दिसून येत आहे. 


तर आम्ही गोकुळ, राजाराम कारखान्यावर प्रशासक आणू शकलो असतो


दुसरीकडे सतेज पाटील (satej patil on Gokul) यांनीही विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. आम्ही ठरवलं असतं तर गोकुळ बरोबर राजाराम कारखान्यावर प्रशासक आणू शकलो असतो. आम्ही सत्तेचा वापर करून कुणावर सूडबुद्धीने कारवाई केली नाही. केवळ दोन वर्षांची कशाला 25 वर्षांचा लेखापरीक्षण करायला पाहिजे. महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी काँग्रेसचेच केदार दुग्धविकास मंत्री होते. त्यामुळे आम्ही ठरवलं असतं, तर गोकुळ बरोबर राजाराम कारखान्यावर प्रशासक आणू शकलो असतो. 


दरम्यान, ‘गोकुळ’मध्ये शौमिका महाडिक (Shoumika Mahadik on Gokul) सातत्याने संघाच्या कारभाराविषयी प्रश्‍न उपस्थित करत आहेत. सत्तांतरानंतर पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाडिक यांनी प्रश्‍नांची सरबत्ती केली होती. दरम्यान, शौमिका महाडिक यांनी गोकुळच्या काही व्यवहारांबाबत माहिती मागवली होती. गोकुळकडून आपल्याला कोणतीही योग्य माहिती दिली जात नाही. संचालक पदाच्या अधिकारावर गदा आणली जात आहे. संचालिका म्हणून महाडिक यांनी जे प्रश्‍न उपस्थित केले, त्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत, असे पत्र जिल्हा उपनिबंधकांनी गोकुळ प्रशासनाला दिले होते. 


संघाचे खरे लेखे उघडकीस आणले नसल्याने चाचणी लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी शौमिका महाडिक यांनी (Shoumika Mahadik on Gokul) कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाच्या लेखापरीक्षा मंडळाच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार 10 दिवसांत गोकुळचे चाचणी लेखापरीक्षण पूर्ण करण्यात यावेत, अशा सूचना लेखापरीक्षा मंडळाच्या विशेष कार्यकारी अधिकारी यांनी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक बी. एस. मसुगडे यांना दिल्या आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या