नवी दिल्ली : देशात बनावट नोटांचा सुळसुळाट सुरुच असल्याने  बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (National Investigation Agency) आज (2 डिसेंबर) देशभरात छापेमारी केली. चार राज्यातील विविध भागांमध्ये छापेमारी करत बनावट नोटांच रॅकेट उध्वस्त केलं आहे. या कारवाईत बनावट नोटा, प्रिंटिंग पेपर, प्रिंटर आणि डिजिटल गॅझेट NIA कडून जप्त करण्यात आली आहेत. एनआयएकडून गेल्या महिन्यात म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी नोंदवलेल्या एफआयआर प्रकरणाच्या अनुषंगाने ही छापेमारी करण्यात आली. 


सीमेपलीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची Fake Indian Currency Notes (FICN) तस्करी करण्यासाठी आणि भारतात त्यांच्या चलनाला चालना देण्यासाठी संशयित व्यक्तींनी रचलेल्या मोठ्या कटाशी संबंधित 24 नोव्हेंबर रोजी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या NIA च्या तपासाचा एक भाग म्हणून हे छापे टाकण्यात आल्याचे एनआयए प्रवक्ते म्हणाले.


महाराष्ट्रातून  कोल्हापूर जिल्ह्यातील राहुल तानाजी पाटील याचाही छापेमारीत समावेश


एनआयएच्या पथकांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आरोपी राहुल तानाजी पाटील उर्फ जावेद, उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यातील विवेक ठाकूर उर्फ आदित्य सिंह आणि कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील संशयित महेंद्र, यवतमाळ जिल्ह्यातील शिवा पाटील उर्फ भीमराव यांच्या घराची झडती घेतली. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील शशी भूषणवरही छापे टाकण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.


ठाकूरच्या घरातून 6,600 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या बनावट भारतीय चलनी नोटा (FICN) (500, 200 आणि 100 रुपयांच्या) आणि चलन छपाईच्या कागदासह जप्त करण्यात आल्याचे प्रवक्त्याने सांगितले. ठाकूर आणि पाटील आणि इतरांनी सीमावर्ती देशांतून बनावट नोटा आणि छपाईचे सामान आणले. या अधिकाऱ्याने सांगितले की, बनावट चलन भारतभर पसरवले जात होते. पाटील बनावट नोटा पुरवण्याचे आश्वासन देऊन पेमेंट करण्यासाठी फसव्या पद्धतीने मिळवलेल्या सिमकार्डचा वापर करत होता, असेही प्रवक्त्याने सांगितले. महेंद्रच्या घराची झडती घेतल्याने FICN तयार करण्यासाठी प्रिंटर जप्त करण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या