कोल्हापूर : शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांचे भरभरून कौतुक केल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत. इतकंच नाही, तर त्यांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यावरून केलेल्या वक्तव्याने सुद्धा भूवया उंचावल्या आहेत. निमशिरगावमधील कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित होते. स्वातंत्र्यसेनानी पी. बी. पाटील विकास सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी धैर्यशील माने यांनी केलेल्या वक्तव्यांची चांगली चर्चा रंगली. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर धसका की सावध पवित्रा याची सुद्धा चर्चा रंगली आहे. हातकणंगले मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून माने यांच्यावरून नाराजीचा सूर आहे. 


शरद पवार म्हणजे देशाचे नेतृत्व करणारे ८४ वर्षाचा तरुण 


धैर्यशील माने यांनी कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं. शरद पवार म्हणजे देशाचे नेतृत्व करणारे 84 वर्षाचा तरुण अशी स्तुतीसुमने उधळली. लाखोंच्या जमांवामधून कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणारा नेता असं म्हणत त्यांचं कौतुक केलं. त्यामुळे शरद पवार यांचं केलेलं कौतुक चर्चेचा विषय ठरला. 


 सतेज पाटलांची कोल्हापुरात कळ काढून चालत नाही!


धैर्यशील माने शरद पवारांची स्तुती करतानाच सतेज पाटील यांच्याबाबतही वक्तव्ये केली. सतेज पाटील यांचं शिरोळ तालुक्यावर विशेष लक्ष असल्याने त्यांची कळ काढून चालत नाही, असेही धैर्यशील माने म्हणाले. 


दरम्यान, हा कार्यक्रम शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याने कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दांडी मारली. कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी हसन मुश्रीफ यांचे पत्रिकेत नाव होते. तसेच शरद पवार आणि हसन मुश्रीफ दोघांचेही फोटो होते. मात्र, मुश्रीफ यांनी मात्र पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने उपस्थिती न लावल्याची माहिती आहे. 


शरद पवार काय म्हणाले?


या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण केंद्रीय गृहमंत्री असताना दिलेलं योगदान प्रचंड आहे.  देशासाठी काम करणाऱ्या मान्यवरांमध्ये पी. बी. पाटील यांचे नाव घेतल्याशिवाय यादी पूर्ण होऊ शकत नाही. देशाच्या विकासासाठी काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये रत्नाप्पा कुंभार आणि पी. बी. पाटील यांचा समावेश होता. ते पुढे म्हणाले की, रत्नाप्पा कुंभार आणि मी एका मंत्रीमंडळात होतो. एखाद्या प्रश्नाची सखोल माहिती घेऊन काम केलं जायचं. निमशिरगाव या गावात मी काही पहिल्यांदाच आलो नाही. यशवंतराव चव्हाण, रत्नाप्पाण्णा कुंभार, पी. बी. पाटील असतील यांच्या समवेत मला काम करता आली. 


इतर महत्वाच्या बातम्या