कोल्हापूर : पाणीदार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur News) सुद्धा यंदा दुष्काळाचे गडद सावट आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये 20 मंडलांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर |(Moderate drought in 20 mandals of Kolhapur district) करण्यात आला आहे. या मंडलांमध्ये 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊसमान झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यावर सुद्धा यंदा दुष्काळाळी टांगती तलवार आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत 1228 मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 


178 तालुक्यांमधील 959 मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मान्यता


दरम्यान, यापूर्वीच गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुका मध्यम दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सरकारने राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून आता आणखी काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याठिकाणी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यामुळे राज्याचा आढावा घेऊन 178 तालुक्यांमधील 959 मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मंत्रिमंडळाच्या उपससमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या मंडलांची सविस्तर यादी शासन आदेश आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.


त्याचबरोबर लम्पी आजाराचा विचार करता दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांसाठी चारा छावणी उभारणे योग्य नसल्याने चारा जनावरांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. राज्यात एकूण 3 कोटी 28 लाखांहून अधिक पशुधन आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत 1228 मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या