कोल्हापूर : भाजपचा राजकीय विचार ज्या ठिकाणाहून संपतो, तेथून शरद पवार साहेबांचा विचार सुरू होतो. भाजपने घर फोडलं, पक्ष फोडला, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर दोन पक्ष फोडले, त्यामुळे वार मुळावर होणं गरजेचं आहे, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला. शरद पवार यांची कोल्हापुरात (Kolhapur News) शुक्रवारी 25 ऑगस्ट रोजी सभा होत असून या सभेपूर्वी रोहित पवार जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.
त्यांना महत्त्व द्यायचं नाही हे पवार साहेबांच्या डोक्यात असेल
शिवसेना फुटली आणि आपापसात भांडत बसले, भाजप बघत बसले. उद्धव ठाकरे यांनी पक्ष फुटल्यानंतर एक वर्षांनी भाजपवर टीका सुरू केली आहे, शरद पवार साहेब यांनी पहिल्यापासूनच भाजपवर टीका सुरू केली आहे. मुळावर घाव घालून जे गेलेत त्यांना महत्व द्यायचं नाही हे पवार साहेबांच्या डोक्यात असेल. कार्यकर्त्यांची ताकद हीच आमची ताकद आहे, आम्ही सर्वजण फिरत आहे. आदित्य ठाकरे यांनी आणि आम्ही देखील संघर्षाची भूमिका ठेवली आहे. सत्तेत राहणं सोपं होतं, पद मिळवणे सोपं होतं, पण हे सगळं धुडकावून विचाराबरोबर राहून संघर्षाची तयारी आम्ही केली आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.
साहेब थेट मुळावर घाव घालतात, भाजपला टार्गेट केलंय
रोहित पवार म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्राला पुरोगामी विचार दिला आहे. दसरा चौकातून पुन्हा एकदा महाराष्ट्राला पुरोगामी संदेश द्यायचा असेल त्यामुळे दसरा चौकाची पवार साहेबांनी केली असेल. येथील ताकद आहे ती कार्यकर्त्यांची आहे, आम्ही केवळ साहेबांचा संदेश घेऊन आलो आहोत. आमदार किती आहेत त्याच्यापेक्षा कार्यकर्ते किती आहेत हे महत्वाचे आहे. त्यांनी पुढे सांगितले की, साहेबांना एका पत्रकारांनी विचारलं होतं की आपल्यासोबत किती आमदार आहेत. त्यावेळी साहेबांनी शून्य असं उत्तर दिलं होतं. आमदारांपेक्षा लोकांमध्ये जाऊन लोकांची ताकद घेऊन विचार जपण्याची गरज असल्याचं साहेबांनी म्हटलं होतं. भाजपने घर फोडलं, पक्ष फोडला, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर दोन पक्ष फोडले. त्यामुळे वार मुळावर होणं गरजेचं आहे. साहेब थेट मुळावर घाव घालतात, भाजपला टार्गेट केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या