maharashtra mini olympic : महाराष्ट्र राज्य शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतीने 1 ते 12 जानेवारी  दरम्यान मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन होत आहे. या स्पर्धेसाठी आज किल्ले रायगडवरून आलेल्या क्रीडा ज्योतचे कुस्ती खेळाडू प्रमिला पोवारच्या हस्ते कोल्हापूरमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले. क्रीडा ज्योतच्या स्वागतानंतर रॅलीची सुरूवात करण्यात आली. रॅली भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदीर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, कोल्हापूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिंदू चौक या मार्गाने ज्योत पुढे पुणे जिल्ह्यातील क्रीडा नगरी बालेवाडीकडे मार्गस्त झाली. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील  क्रीडा प्रबोधिनीचे कुस्ती, शुटींग, हॉकी प्रशिक्षण केंद्र, वेटलिफ्टींग प्रशिक्षण केंद्र, वुशू, तायक्वांदो आदी खेळाचे खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


राज्यातील शहरी आणि विशेषत: ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातून आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसह विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी दर्जेदार क्रीडापटू तयार व्हावेत, या हेतूने राज्यात मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होत आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतीने स्पर्धांचे आयोजन होत आहे. या स्पर्धेमध्ये ४० विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. राज्यातील एकूण 10 हजार 456 खेळाडू व मार्गदर्शक या स्पर्धेत सहभागी होतील.


संपूर्ण राज्यामध्ये क्रीडा विषयक वातावरणासाठी 8 विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ऑलम्पिक स्पर्धेच्या ज्योत रॅली आयोजन करण्यात आले आहे. रायगडावरून क्रीडा ज्योतीचे प्रस्थान होवून आज भवानी मंडपात पोहचली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी उपस्थित व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.  रॅली कार्यक्रमाचे यशस्वी संपन्न होण्यासाठी प्रविण कोंढवळे, सागर जाधव, पांडुरंग देशपांडे, अविनाश पाटील, वैभव हालके, आनंदा पाटील, संदीप जाधव, गौरव खामकर, सतीश पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे अधिकारी, तर आभार सुधाकर जमादार यांनी मानले.


महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र शासन आणि क्रीडा व युवक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यामाने होणार आहेत. स्पर्धेच्या ठिकाणाचा विचार करता पुणे, मुंबई, जळगाव, नाशिक, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांत होणार असून, विविध अशा 39 क्रीडा प्रकार या स्पर्धेत खेळवले जाणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या