Maratha Reservation : मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा अधिवेशन काळातच आंदोलन छेडू असा इशारा राज्यातील मराठा संघटनांनी दिला आहे. आज कोल्हापूरमध्ये राज्यातील 42 मराठा संघटनांची एक परिषद पार पडली. या परिषदेमध्ये मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सुरुवातीला सरकारशी संवाद साधू जर सरकारने प्रतिसाद दिला नाही तर आंदोलन छेडू असा निर्णय घेण्यात आला. कोल्हापुरात झालेल्या या परिषदेमध्ये 10 टक्के मराठा आरक्षण मिळावं या मागणीवर ठामपणे चर्चा झाली. तसेच हात उंचावून अकरा ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये ओबीसी प्रवर्गातील ज्या सोयी सवलती आहेत त्या मराठा समजला आहे तशाच लागू कराव्या हा मुख्य मुद्दा या बैठकीमधून पाहायला मिळाला. 

हात उंचावून अकरा ठराव मंजूर 

1) महाराष्ट्र शासनाने ओ. बी. सी ममाजाला ज्या ज्या सोयी सवलती लागू केल्या आहेत. त्या जशाच्या तशा मराठा समाजाला सरसकट लागू करणेत याव्यात.2) हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेटनुसार महाराष्ट्र शासनाने अमंलबजावणी करावी 3) महाराष्ट्रा मध्ये ओ. बी सी प्रमाणे एस. ई. बी. सी (मराठा समाज) प्रवर्गातील विद्यार्थीना प्रतिपुर्ती करावयाच्या इतर शुल्काबाबतची सवलत द्यावी 4) महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र देणेसाठी जिल्हा व तालूका पातळीवर समिती गठण करून या समितीमध्ये मराठा समाजाचे दोन प्रतिनिधींना समाविष्ट करून घ्यावे.5) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणारे व परराज्यात शिकणा-या ओ बी सी प्रवर्गातील विद्यार्थीप्रमाणे शिष्यवृत्ती योजना मराठा समाजाला लागू करणे बाबत 6) महाराष्ट्रात ओ.बी.सी प्रमाणे एस. ई. बी. सी प्रवर्गातील युवक युवती करीता मोटर वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना लागू करणेबाबत 7) मराठा आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच शासन निर्णया यानुसार तपासून मागे घेण्यात यावेत8) मराठा समाजाला एस. ई. बी. सी प्रवर्गा अंर्तगत 10% आरक्षण लागू केले आहे. सद्या ते न्यायप्रविष्ट आहे. ते राज्य शासनाने न्यायालयामध्ये आपली वाजू भक्कम मांडून आरक्षण टिकवावे9) मराठा भुषण आण्णासाहेव पाटील आर्थिक विकास महामंडळ हे फक्त मराठा समाजाला लागू करावे. तसेच व्याज परतावा व इतर कर्ज प्रकरणे वेळेत पुर्ण करणेत यावीत10) अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाचे काम तातडीने चालू करणेत यावे.11) महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे सवंर्धन करणेत यावे.

इतर महत्वाच्या बातम्या