Kolhapur hydraulic weighing machine: राज्यातील ऊस गळी हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील साखर सम्राटांकडून होणाऱ्या ऊसाच्या काटामारीवर (sugarcane weighing fraud) जाहीर भाष्य करण्यात आलं. जे काटामारी करत आहेत, त्यांची नावे आम्हाला माहीत झाली असून त्यांना लवकरच दाखवतो असा गर्भित इशारा दिला. मात्र, ही काटामारी रोखण्यासाठी राज्यामध्ये यंत्रणा अस्तित्वात असतानाही त्याचा वापर झालाच नसल्याची धक्कादायक माहिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर सम्राटांची काटामारी रोखण्यासाठी 2014 मध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून हायड्रोलिक व्हॅन खरेदी करण्यात आली. मात्र, तेव्हापासून ते आजतागायत या हायड्रोलिक क्रेनचा एकदा सुद्धा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून घेतलेली हायड्रोलिक क्रेन कोल्हापुरात गोकुळ कार्यालया परिसरात धुळखात पडली आहे. गोकुळ प्रशासनाकडून आतापर्यंत अनेकवेळा विनंती करूनही ही क्रेन अन्यत्र हलवण्यात आलेली नाही किंवा वापर सुद्धा करण्यात आलेला नाही. 

Continues below advertisement

सर्वच्या सर्व क्रेन धुळखात पडल्याचे चित्र (hydraulic crane unused)

वैधमापन विभागाचे दत्तात्रय पवार यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला असता त्यांना या क्रेनसाठी ड्रायव्हर आणि ऑपरेटर नसल्याने बंद असल्याचे सांगितले. शासकीय पातळीवर यासंदर्भात पत्रव्यवहार सुद्धा केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, इतक्या फालतू आणि हास्यापद कारणास्तव कोट्यवधी रुपयांची क्रेन धुळखात पडली असेल, तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. साखर कारखानदारांची काटामारी रोखण्यासाठी हायड्रोलिक क्रेन अत्याधुनिक पद्धतीची असून या हायड्रोलिक क्रेनमध्ये जवळपास शेकडो किलोच्या वजनी प्लेट असून  त्या प्लेट थेट साखर कारखान्याच्या काट्यावर ठेवल्यानंतर त्याचे वजन दिसून येते. त्यामुळे काटमारी रोखण्यासाठी जवळपास 15 क्रेन खरेदी करण्यात आल्या. मात्र, या सर्वच्या सर्व क्रेन धुळखात पडल्याचे चित्र आहे. पुण्यामधील विभागीय कार्यालयामध्ये क्रेन धूळखात पडली आहे. त्यामुळे काटामारी रोखण्याची मानसिकताच कोणाची आहे की नाही? असाच प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकरी संघटनांकडून सुद्धा साखर कारखान्यांकडून होणारी काटामारी समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, साखर सम्राटांच्या दबावामुळे कोणताच ठोस पर्याय निघालेला नाही. 

काटामारी करणारे, रिकव्हरी चोरणारे तुमच्या सोबत (sugarcane cut fraud Maharashtra) 

त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटामारीला थेट हात घातला असेल, तर आता थेट कारवाई करूनच थांबावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं होतं आणि काटामारी करणारे, रिकव्हरी चोरणारे तुमच्या सोबतच असल्याचा प्रहार केला होता. इतकेच नव्हे तर तुमच्या पक्षाचे पोलादी पुरुष अमित शाह यांच्यामध्ये सुद्धा ही काटामारी रोखण्याची धमक नसल्याचे म्हटले होते. दुसरीकडे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनीही ही क्रेन कार्यरत होण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र, कोल्हापुरातील वैधमापन विभागाकडूनक कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. 

Continues below advertisement

त्यामुळे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे काटा मारणाऱ्याची यादी गेली असेल तर आता आपण या क्रेन कार्यरत करून या गळीत हंगामामध्ये काटामारी करणाऱ्या साखर सम्राटांना दणका द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्यातील सर्व साखर कारखान्याचे कारखान्यांचे काटे ऑनलाइन केल्यास निश्चितच काटामारी रोखली जाऊ शकते.त्यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड होण्याची शक्यता नाही. मात्र, या पद्धतीची यंत्रणा कार्यरत करण्याची गरज आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या