कोल्हापूर : वाढीव टप्पा अनुदानासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने विविध माध्यमातून कोल्हापुरात आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरात शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये एक ऑगस्टपासून अशंत: विनाअनुदानित शिक्षकांनी आंदोलन पुकारलं आहे. मात्र, शासनाने याची दखल घेतली नसल्याने शेवटी शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.


शेवटी आमच्या येथून तिरढ्या उचलाव्या लागतील 


गेल्या चार दिवसांपासून शिक्षतांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे. आजचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. शिक्षकांनी कार्यालयात भजन करत आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जोपर्यंत शासन वाढीव टप्पा अनुदानाचा जीआर काढत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. शिक्षकांना वाढीव टप्यानुसार अनुदान देणार नसाल, तर शेवटी आमच्या येथून तिरढ्या उचलाव्या लागतील असा इशारा आंदोलक शिक्षकांनी दिला आहे. 


राज्य सरकारने  जून 2024 पासून वाढीव 20 टक्के टप्पा दिला जाईल, अशी घोषणा केली होती. परंतु, सदर घोषणेचा आदेश शासन निर्णय अद्याप करण्यात आलेला नाही. शासनाने पुढील वाढीव टप्प्याचे अनुदान आदेश काढावेत. 15 मार्च 2024 चा जाचक संचमान्यतेचा आदेश रद्द करून सुधारित आदेश काढावा, यासाठी एक ऑगस्टपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर विनाअनुदानित कृती समितीकडून धरणे आंदोलनास सुरुवात झाली आहे. आजचा आंदोलनाचा 29 वा दिवस आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा शिक्षकांकडून देण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या