Deepak Kesarkar on NCP : राष्ट्रवादी काँग्रेसने कपटनीतीने शिवसेनेचे दोन तुकडे केले, येत्या निवडणुकीत त्याची परतफेड राष्ट्रवादीचे दोन तुकडे करून कोल्हापूरचे पाचही बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार निवडून आणून जिल्ह्यातील जनतेने करावी, असा सल्ला पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिला. बाळासाहेबांची शिवसेनेकडून कागल तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचाचा हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आंबेडकर, सुजित चव्हाण, वीरेंद्र मंडलिक आदी उपस्थित होते. 

Continues below advertisement

Maharashtra Political Marathi News ; कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन दाखवू

मंत्री केसरकर पुढे म्हणाले की, मी किती काळ पालकमंत्रीपदावर राहणार माहित नाही, पण येत्या सहा महिन्यात कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन दाखवू. कोल्हापूरचे नाव भारतात प्रथम क्रमांकावर यावे यासाठी पहिल्या दिवसापासून मी प्रयत्नशील आहे. कोट्यवधींचा निधी पंचगंगा पाणी प्रदूषण रोखण्यासाठी दिला आहे, कोणीही पैशाला विकला जात नाही. जे लोकांना प्रेम देतात, त्यांच्या मागे जनता राहते. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत.

Maharashtra Political Marathi News ; आम्ही सत्तेत आल्यानंतर निधी मिळत आहे

खासदार संजय मंडलिक म्हणाले की, आम्हाला निधी मिळाला नाही, आम्ही सत्तेत आल्यानंतर निधी मिळत आहे. नजीकच्या काळात कोल्हापूर जिल्हा बाळासाहेब यांच्या शिवसेनेचा असेल. मतदारसंघात चांगला निधी खेचून आणून जनतेला काय पाहिजे हे बघून लोकप्रतिनिधींनी सर्वांनी एकत्र करून विकास कामे करावीत. सरपंचांसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजन केले जाईल. कार्यक्रमात जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्यजित पाटील, बाबा नांदेकर, शिवाजी चौगुले तसेच शेतकरी सहकारी संघावर प्रशासकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सूर्याजी देसाई व जयवंत पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

Continues below advertisement

Maharashtra Political Marathi News ; कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी 70 कोटींचा निधी मंजूर

दरम्यान,  कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 70 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री तथा  शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत नगरोत्थान योजनेचा आढावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून मुंबईहून घेतला. दरम्यान, नगरोत्थान अभियानांतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला दहा कोटी, इचलकरंजी महानगरपालिका नऊ कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या