Kolhapur Big Egg : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे अशी सर्वमान्य म्हण प्रचलित आहे. त्यामुळे अंडे हा शब्द सामान्य असला, तरी कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur Big Egg) आढळलेलं चांगलाच कुतूहलाचा विषय झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे गावामध्ये पोल्ट्रीमध्ये महाजम्बो अंडं सापडलं आहे.  महाजम्बो अंड हा शब्द ऐकून आपल्याला आश्चर्य वाटला असेल, पण देशातील सगळ्यात मोठे आणि वजनदार अंडे कोल्हापुरातील एका पोल्ट्रीमध्ये आढळून आलं आहे. या अंड्याचे वजन 210 ग्रॅम आहे. त्यामुळे हे देशातील महाजम्बो आणि वजनदार अंडं ठरलं आहे.


हे महाजम्बो अंडं कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे गावात दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्रीमध्ये सापडलं आहे. सर्वसाधारण अंडं ते जम्बो अंडं आणि आता महाजम्बो अंडं असा हा प्रवास झाला आहे. दिलीप चव्हाण गेल्या 40 वर्षांपासून या व्यवसायात आहेत, पण अशा पद्धतीचे अंडे त्यांनी कधी पाहिलेलं नाही.



देशात आतापर्यंत 162 ग्रॅम वजनाचे कोंबडीचे अंडे पंजाबमध्ये सापडलं होते. त्याची लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. तर 500 ग्रॅमचे अंडे परदेशात सापडलं होतं, पण आपल्या देशातील हे सर्वात मोठं अंडं आहे. दरम्यान, अशा पद्धतीने कोंबडीने एखादा अंडे दिलं तर ते खूप नाजूक किंवा कवच नसलेले असतं. मात्र, पण हे अंडे अतिशय सुस्थितीत असून कुतूहलाचा विषय बनला आहे.


सामान्य अंड्याचे वजन किती असते?


सर्वसाधारणपणे 50 ते 70 ग्रॅम वजनाचे अंडी असतात. त्यामध्ये कवच सोडून (Without Shell) 50 ग्रॅम वजन असते. पांढरा बलक (White Only) 30 ग्रॅम असतो, तर पिवळा बलक (Yolk Only) 18 ग्रॅम असते. 


इतर महत्वाच्या बातम्या