kolhapur Weather : फेब्रवारी महिन्याचा पंधरवडाही पार झालेला नाही तोपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात (Kohapur Weather) उन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी मध्यापूर्वीच कोल्हापूर तापण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी जिल्ह्यातील तापमानाचा पारा 35 अंशापर्यंत जाऊन धडकला. त्यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवल्या. रविवारी कोल्हापूरच्या सरासरी तापमानात तीन अंशांनी वाढ झाल्याने पारा ३५ अंशांवर पोहोचला. तापमानात अचानक वाढ झाल्याने उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. 


पुढील सहा दिवस कोल्हापूर तापण्याची शक्यता  


दरम्यान, पुढील सहा दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) पारा 34 ते 35 अंशांदरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात तुलनेत उन्हाचे चटके जाणवत नाहीत. मात्र, थंडीचा महिना असूनही थंडी न जाणवता फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापूर्वीच उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून पारा 33 अंशांपुढे जात आहे. आजही (13 फेब्रुवारी) हवेत उष्मा जाणवला. दुसरीकडे, रात्रीच्या किमान तापमानातही पुढील सहा दिवसांत ती 17 अंशांपर्यंत खाली जाईल, असाही हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे दिवसभर उष्ण हवमान आणि संध्याकाळी पारा घसणार अशी परिस्थिती आहे. 


मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट 


मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात घट झाली आहे. उद्या (14 फेब्रुवारी) देखील दोन्ही भागातील किमान तापमान कमीच राहणार आहे, मात्र 15 फेब्रुवारीनंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. औरंगाबादमध्ये 10.2 अंश सेल्सिअस, नाशिक 10.9, पुणे 10.6, महाबळेश्वर 13.4, बारामती 12.8 आणि जळगावात 11.5  अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 


मुंबईकरांना दोन दिवसांपासून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. मुंबईत काल (रविवारी)  तापमान कमाल तापमान 36 अंशांवर गेले होते. मुंबईसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हात फिरताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मुंबईतील तापमान गेल्या एक दोन दिवसांपासून वाढ होत असून मुंबईतील कमाल तापमान देखील 36 अंशांवर गेले आहे. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 24.2 अंश सेल्सिअसची नोंद तर कुलाब्यात 23.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. रविवारी (12 फेब्रुवारी) मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 16.6 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या