Continues below advertisement

Kolhapur Soybean Farmer Loss: कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मोहरेमधील शेतकरी महिलेनं पाऊण एकर उभ्या सोयाबीन पिकावर (Kolhapur Soybean Farmer Loss) ट्रॅक्टर फिरवला. भारती बाबूराव पवार या महिलेनं जूनमध्ये तीस गुंठ्यात सोयाबीन पीक घेतलं होतं. पिक चांगल्याप्रकारे जोमात आलं होतं. मात्र, वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्याने मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पिक खराब झाल्याने भारती पवार यांनी सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घेतला. सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

 

Continues below advertisement

 

60 लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त (60 Lakh Hectare Crop Damage Maharashtra) 

दुसरीकडे, राज्यात मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात महापुराने जनजीवनावर व शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठा परिणाम केला आहे. राज्यात एकूण 60 लाख हेक्टरांपेक्षा अधिक पिकं महापूर व अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली असल्याचा अंदाज आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,96,500 एकर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचे, आणि 223,661 शेतकऱ्यांना दणका बसला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे 31,98,470 हेक्टर पिकक्षेत्र नुकसान झाले असल्याचा आकडा आहे. सरकारने 2,300 कोटी रुपयांची मदत पॅकेज जाहीर केली असली, तरी ती तुटंपूजी असल्याचा आरोप होत आहे. 

हेक्टरी 50 हजारांची मदत करण्याची मागणी (Farmers Aid Demand 50k Per Hectare)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on Farmer Aid) यांच्यासह महाविकास आघाडीने हेक्टरी 50 हजारांची मदत करण्याची मागणी केली आहे. काल झालेल्या केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी राज्याने प्रस्ताव सादर केल्यास मदत देऊ, असे आश्वासन दिले होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत राज्यातील महापूर स्थिती शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात चर्चा केली होती. शाह यांनी आपल्या भाषणात तिघांशी चर्चा झाल्याचा उल्लेख केला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या