Yellow Alert : हवामान विभागाकडून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. 6 ते 9 जूनपर्यंत 13 जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मान्सुन सरींसाठी परिस्थिती सध्या अनुकूल नाही. 6 ते 9 जून या कालावधीमध्ये हवेचा दाब काही भागांमध्ये किंचित कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सून रेंगाळल्याने राज्यात उष्णतेची लाट
सर्वसाधारणपणे अंदमानमध्ये मान्सून (Mansoon) 22 मे दरम्यान येतो. मात्र, यावर्षी त्याला अपवाद ठरल्याने मान्सून 16 मे रोजी दाखल झाला. त्यानंतर केरळमध्येही चार दिवस अगोदर दाखल झाल्याने आनंदाचे वातावरण होते, पण अरबी समुद्रात आल्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला आहे.
महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा
दुसरीकडे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाच्या चटक्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.
अरबी समुद्राच्या बाजूने मान्सूननं 29 मे रोजी केरळात प्रवेश केला. त्यानंतर 31 मे रोजी मान्सून कर्नाटकमध्य पोहोचला. गोव्यापासून काही अंतरावर असताना पोषक वातावरणामुळे तो केवळ दोन दिवसांत केरळमध्ये (Kerala)पोहोचेल, असं भाकीत हवामान विभागानं केलं होतं, पण अचानक हवामानात झालेल्या बदलामुळं नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला.
पाऊस येतो हे नेमकं ओळखायचं ?
Panjabrao Dakh on Monsoon : 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी व्यक्त केला आहे. तर 22 जूनपर्यंत संपूर्ण देशात पाऊस पडेल असेही डख यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण वाढले आहे, कारण मान्सून पूर्वेकडून येत आहे. ज्यावेळी मान्सून पूर्वेकडून येतो त्यावेळी पाऊस जास्त पडतो. यावर्षी देखील मान्सून पूर्वेकडूनच आला असून, पावसाचे प्रमाण जास्त असल्याचं डख यांनी सांगितलं. माढा तालुक्यातील मानेगाव इथे सुभेदार गणेश लांडगे यांच्या सैन्य सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात डख बोलत होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या