Kolhapur Roads PIL: कोल्हापूर शहरातील (Kolhapur municipal corporation roads) गुडघाभर खड्ड्यातील रस्त्यांचा प्रश्न आता कोल्हापूर सर्किट बेंचसमोर (Kolhapur circuit bench) गेला आहे. कोल्हापुरात खड्ड्यात नव्हे, तर गुडघाभर खड्ड्यात असल्याचा पुरावे दाखवणाऱ्या 77 रस्त्यांची कुंडली या याचिकेच्या माध्यमातून सर्किट बेंचसमोर मांडण्यात आली आहे. याचिकेत ठेकेदार, शासकीय अधिकारी आणि राजकारण्यांची टक्केवारी सुद्धा अधोरेखित करण्यात आली आहे. या जनहित याचिकेच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील रस्ते उत्तम दर्जाचे करण्यात यावेत यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये मोठा गाजावाजा करूनही दैना झालेल्या 100 कोटी प्रकल्पातंर्गत रस्त्यांचा सुद्धा समावेश आहे. कोल्हापूर शहरातील शाहूनगर पांजरपोळ, टाकाळा रोड, मंगळवार पेठ- मिरजकर तिकटी-रेसकोर्स नाका, फुलेवाडी- बालिंगा, देवकर पाणंद, रंकाळा यासह 77 रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे.

Continues below advertisement

याचिकेत कोणाला प्रतिवादी करण्यात आलं? (Kolhapur potholes issue) 

ही जनहित याचिका उदय नारकर, भारती पवार, डॉ. रशिया पडळकर, डॉ. अनिल माने, अॅडव्होकेट सुनिता जाधव व प्रा. डॉ. तेजस्विनी देसाई यांच्यासह सजग नागरिकांमार्फत वकील असीम सरोदे यांनी (Asim Sarode petition) कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. याचिकेत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या सचिवांना प्रतिवादी करण्यात आलं आहे. 

77 महत्त्वांच्या रस्त्यांचा याचिकेत उल्लेख (Kolhapur public interest litigation) 

असिम सरोदे यांनी सांगितले की, कोल्हापूर शहरातील (Kolhapur municipal corporation roads) 77 महत्त्वांच्या रस्त्यांचा याचिकेत उल्लेख करण्याता आला आहे. या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे ड्रेनेज व्यवस्था शास्त्रीय पद्धतीने दिसत नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणी येऊन पुरस्थिती निर्माण होते. फुटपाथ नसल्याने पादचाऱ्यांचे हक्कांचे उल्लंघन केलं जात आहे. कोल्हापूरला सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते मिळावेत असे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, रस्त्यांचे शास्त्रीय पद्धतीने पॅचवर्क करण्यात यावेत, रस्ते सुरक्षा समिती नेमली नसल्यास ती नेमण्यात यावी. रस्त्यांच्या कामात जो वारंवार उल्लेख होत असतो ते राजकीय संगनमत दिसल्यास उच्च न्यायालयाने आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली असल्याचे सांगितले. 

Continues below advertisement

कोल्हापूर गुडघाभर खड्ड्यात (Kolhapur potholes issue) 

कोल्हापूर शहराची रस्ते पाहून अत्यंत भीषण झाली आहे. शहरातील प्रमुख आणि कोल्हापूर शहराची ओळख असणारे चौकही गुडघाभर खड्ड्यात गेले आहेत. यामुळे वाहनधाकांसह नागरिकांचा सुद्धा जीवघेणा प्रवास सुरु आहे. महाकाय खड्डे दररोज अपघाताला निमंत्रण देत असून त्याची दाद तरी कोठे मागायची अशी स्थिती झाली आहे. कोल्हापूर शहरासह उपनगरांमध्येही रस्त्यांची विदारक अवस्था आहे. औद्योगिक वसाहती सुद्धा  गुडघाभर खड्डया गेल्या आहेत. त्यामुळे शहरात रस्ता शोधून दाखवा, असे म्हणायची वेळ आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या