कोल्हापूर पाऊस : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने पूर्णत: उघडीप दिली आहे. पावसाने उघडीप दिली असतानाच गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पारा 28 अंशापर्यंत उन्हाचे चटकेही जाणवू लागले आहेत. सायंकाळ झाल्यानंतर थंडीही जाणवत असल्याने नागरिकांच्या तब्येतीवरही परिणाम होत आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने आता केवळ तीन बंधाऱ्यावर पाणी असून उर्वरित सर्व बंधाऱ्यांवरील पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. केवळ पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, रुई आणि इचलकरंजी असे 3 बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी 15 फुटांपर्यंत खाली आली आहे.  


कोल्हापुरात (Kolhapur News) राजाराम बंधारा तब्बल महिनाभरापासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. राधानगरी धरणाचेही सर्व दरवाजे बंद असून केवळ पाॅवर हाऊसमधून भोगावती नदी पात्रात 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 4.9 मिमी पावसाची नोंद झाली. 


जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे


हातकणंगले- नाही, शिरोळ - नाही, पन्हाळा- 1, शाहूवाडी- 0.6 मिमी, राधानगरी- नाही, गगनबावडा-4.9 मिमी, करवीर- 0.2 मिमी, कागल- 0.1 मिमी, गडहिंग्लज- नाही, भुदरगड- 1 मिमी,  आजरा- नाही, चंदगड- 1.4  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणीसाठा


कोल्हापूर जिल्ह्यात धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती तसेच जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. धरणांचे नाव, आजचा पाणीसाठा (टीएमसी मध्ये) आणि धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता (टीएमसीमध्ये) कंसामध्ये आहे. जिल्ह्यातील राधानगरी, कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा व जांबरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. राधानगरी - 8.11 (8.361 टीएमसी), तुळशी 2.69 (3.471 टीएमसी), वारणा 29.64  (34.399 टीएमसी), दुधगंगा 21.08 (25.393 टीएमसी), कासारी 2.63 (2.774 टीएमसी), कडवी 2.52 (2.516 टीएमसी), कुंभी 2.44 (2.715 टीएमसी), पाटगाव 3.39 (3.716 टीएमसी), चिकोत्रा 1.30 (1.522 टीएमसी), चित्री 1.89 (1.886 टीएमसी), जंगमहट्टी 1.22 (1.223), घटप्रभा 1.45 (1.560), जांबरे 0.79 (0.820 टीएमसी ) आंबेओहोळ  1.24 (1.240 टीएमसी ), कोदे ल.पा. 0.21 (0.214 टीएमसी )


दरम्यान, काळम्मावाडी धरण 25.39 टीएमसीपैकी 21.03 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील गळतीमुळे हे धरण 19 टीएमसीपर्यंत भरले जाणार होते. दरम्यान, गळतीचा अंदाज आणि लोकांच्या मागणीनुसार आणखी दोन टीएमसी पाणीसाठा वाढवला आहे. 


सलग पाऊस गायब झाल्याने चिंता 


कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला, तरी अधूनमधून जोरदार सरी येत असल्याने पिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने पिकांची काळजी वाढली आहे. माळरानावरील भुईमूग, भात, सोयाबीन ही पिके पाऊस पूर्णपणे उघडल्यास अडचणीत येऊ शकतात.  


इतर महत्वाच्या बातम्या :