Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) आत्महत्यांची सलग मालिका सुरुच असतानाच 112 क्रमांकावर पोलिसांना (Kolhapur Police) फोन करून वेळीच बोलवल्याने आणि पोलिसही तत्काळ हजर झाल्याने कोल्हापूर शहरात दोन जीव वाचले आहेत. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 112 नंबरवर राजेंद्रनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलच्या मागे एक 29 वर्षीय तरुण झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. मुख्यालयातून 112 नंबरवर संदेश मिळताच राजारामपुरी पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. कॉन्स्टेबल उत्तम माने, भूषण ठाणेकर, अनिल चिले आणि पोलिस नाईक आणि तौफिक मुल्ला तत्काळ पोहोचत झाडावर चढून या सर्व परिस्थितीचे प्रसंगावधान राखून तरुणाला आत्महत्येपासून वाचविले.  


दुसरी एक घटना जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. साळोखे नगरातील एक तरुण नैराश्‍य आणि कौटुंबिक वादातून आई-वडिलांसह पत्नीला मारहाण करत होता. त्यामुळे त्रासाला कंटाळून कुटुंबियांनी 112 या पोलिस नियंत्रण कक्षात कॉल केला. यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. कॉन्स्टेबल मोहन लगारे यांनी तातडीने घटनास्थळ गाठत तातडीने प्रसंगावधान राखून कौशल्याने त्याला वाचविले. गेली काही वर्षे तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आलेल्या अपयशाने नैराश्‍य आल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्याचे समुपदेशन करण्यात आले.


कोल्हापुरात सलग आत्महत्या 


दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात सलग आत्महत्याचे सत्र सुरु आहे. जानेवारी महिन्यात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात 75 जणांनी आयुष्याचा शेवट केला होता. गेल्यावर्षी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 710 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. कोरोनोत्तर कालखंडात अनेकांची बसलेली घडी विस्कटून गेली आहे. अनेकांना आपल्या व्यवसायावर तसेच नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. त्यामुळे नैराश्यामध्ये आत्महत्या करणाऱ्यांची संख्य वाढत चालली आहे.  


एप्रिल महिन्यातही आत्महत्यांचे सत्र सुरुच 


गेल्या 12 दिवसांमध्येही जिल्ह्यात सलग आत्महत्या सुरु आहेत. गडहिंग्लज तालुक्यात सुट्टीवर आलेल्या जवानाने घरीच आत्महत्या केल्याची घटना घडली. तत्पूर्वी, दोन जिवलग मित्रांनी एकाच झांडीला फांदीला एकाचवेळी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पन्हाळा तालुक्यात मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी कर्ज न दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यापूर्वी, 2 एप्रिल माजी महिला सरपंचने पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. शासकीय रुग्णालय असलेल्या सीपीआरमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलेल्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या