Kolhapur Police : कोल्हापूर पोलिसांमध्ये (kolhapur Police) जिल्ह्यांतर्गत पोलीस निरीक्षकांच्या (PI) बदल्या केल्यानंतर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतही (Kolhapur LCB) मोठी खांदेपालट केली आहे. यामध्ये 11 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हे आदेश काढले आहेत. बदली करण्यात आलेल्या पीआयमध्ये एलसीबीच्या पीआयचाही समावेश होता. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची पुनर्रचना झाली आहे. 


कोल्हापूर पोलिसांमध्ये चार पोलिस ठाण्यांमध्ये चार नवीन पोलिस निरीक्षक मिळाले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेलाही नवीन निरीक्षक मिळाले आहेत. त्या ठिकाणच्या 11 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या करण्यात आल्या आहेत. बदलीने त्यांना शहरापासून दूर असणाऱ्या भुदरगड, राधानगरी, गगनबावडा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. गेल्या वर्षात कोल्हापूर पोलिसांची कामगिरी साजेशी झालेली नव्हती. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी कार्यक्षमता सुधारण्यासाठी मोठे फेरबदल केले आहेत. 


18 पीआय आणि 5 एपीआयच्या बदल्या


दरम्यान, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मोठा फेरबदल करताना 18 पोलिस निरीक्षकांच्या (पीआय) 4 जिल्ह्यांतर्गत आणि चार बदल्या करण्यात आल्या आहेत. पाच सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. 


स्‍थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी)चे निरीक्षक संजय गोर्ले यांच्याकडे सायबर पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. त्यांच्या ठिकाणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील महादेव वाघमोडे यांची नियुक्ती केली आहे. पन्हाळा पोलिस ठाण्यातील निरीक्षक अरविंद काळे यांची बदली करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्‍या निरीक्षक स्नेहा गिरी यांची नियुक्ती केली आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांची बदली रत्नागिरीला झाली आहे. त्यांच्या ठिकाणी पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांची नियुक्ती झाली. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांची कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.


सतीशकुमार गुरव आणि श्रीकृष्ण कटकधोंड हे आता अनुक्रमे जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे प्रमुख असतील. राजारामपुरी पोलीस ठाण्यातील ईश्वर ओमासे यांची कागल येथे बदली झाली असून त्यांच्या जागी अनिल तनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भुदरगड पोलिस ठाण्याचे प्रभारी पीआय संजय मोरे आता सांगली पोलिसांत काम पाहणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या