Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बालविवाहाचे (child marriage in kolhapur) प्रमाण चिंताजनक असतानाच (Kolhapur Crime) एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींची प्रस्तुती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील कसबा बावडा परिसरात एक घटना उघडकीस आली, तर दुसरी मोलमजुरीसाठी गिरगाव  (ता. करवीर) आलेल्या धुळे जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीची प्रसूती झाल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. 


दरम्यान, कसबा बावड्यामध्ये (Kolhapur News) झालेल्या प्रसूतीमध्ये मुलीच्या पालकांनी बोगस आधारकार्डचा वापर करून प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाईल्ड लाईन तसेच जिल्हा महिला व बालकल्याण विकास विभागाने उघडकीस आणला. त्यामुळे पालकांविरोधात लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ही मुलगी सध्या 15 वर्षे 7 महिन्यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मजुरीसाठी गिरगावमध्ये आलेल्या धुळे जिल्ह्यातील एका अल्पवयीन विवाहितेची बुधवारी प्रसूती झाली. या प्रकरणी तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच दिवशी कोल्हापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींची प्रसूती झाल्याच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.


मुलगी साडे तेरा वर्षाची असताना लग्न लावून दिले 


बावड्यातील लाईन बाजार परिसरात अल्पवयीन मुलीची प्रसूती होऊन तिला कन्यारत्न झाले. प्रसूती झालेली मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती चाईल्ड लाईन संस्थेला मिळाली होती. चाईल्ड लाईन, बालकल्याण समिती व जिल्हा महिला व बाल अधिकाऱ्यांनी शाहूपुरी पोलिसांच्या मदतीने संबंधित रुग्णालयात जाऊन चौकशी केली. रुग्णालयाने पूर्ण वय असल्याची माहिती दिल्यानंतर त्या मुलीच्या शाळेत चौकशी करण्यात आली. रुग्णालय प्रशासनाने संबंधित मुलीचे पूर्ण वय सांगितल्यानंतर खातरजमा शाळेत संपर्क साधण्यात आला. त्यावेळी मुलीचा जन्म 2007 मधील असल्याचे स्पष्ट झाले. यावरून तिचे सध्याचे वय 15 वर्षे 7 महिने आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी ती मुलगी साडेतेरा वर्षाची असताना तिचा विवाह झाल्याचे समोर आलं आहे. मुलीच्या आईने तिचा विवाह मंगसुळी या ठिकाणी लावून दिला होता अशी माहिती समोर आली आहे. 


अल्पवयीन मुलीची प्रसूती, इस्पूर्लीत गुन्हा दाखल 


दुसरीकडे, मोलमजुरीसाठी निमित्ताने गिरगावमध्ये आलेल्या धुळे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीची सीपीआरमध्ये प्रस्तुती झाली. तिला कन्यारत्न झाले. तिच्या वयाची पडताळणी केली असता तिचे वय  अवघे 13 वर्ष तीन महिने 19 दिवस असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे तिचा पती भैरू अहिरे (रा. जातोडे, सिंदखेडा, धुळे) याच्याविरुद्ध इस्पूर्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या