कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील जत्रेत (Cradle stuck at 80 feet during kagal yatra) जॉईंट व्हील पाळणा अडकला होता. जॉईंट व्हील पाळणा उंचावर अडकल्याने अनेक नागरिक पाळण्यात अडकून पडले होते. कोल्हापूरातून मनपा फायर ब्रिगेडसह रेस्कू टिम कागलच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पंरतु त्या पाळण्यातील सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.(Joint wheel cradle stuck)

Continues below advertisement

Joint wheel cradle stuck: तब्बल चार तास अडकले

मिळालेल्या माहितीनुसार, कागल येथे सुरू असलेल्या श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरुसामध्ये दूधगंगा डेअरीजवळ उभारण्यात आलेला जॉइंट व्हील नावाचा पाळणा तांत्रिक कारणाने वर जाऊन अडकला. या पाळण्यात बसलेले अठरा जण सुमारे ऐंशी फुटांवर जाऊन तब्बल चार तास अडकले होते. रात्री ०८:३० वाजता हे पाळण्यात बसले होते. रात्री ११:३० पासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने एका एका व्यक्तीस खाली घेण्यास सुरुवात केली. रात्री १२:३० वाजता सर्व जण सुखरूप खाली आले. यामध्ये पाच महिला चार लहान मुले व नऊ पुरुषांचा समावेश होता. हे सर्व जण कागल, कणेरी मठ, गोकुळ शिरगाव परिसरातील होते. या पाळण्यात अडकलेल्या १८ जणांच्या सुटकेचा हा थरार तब्बल चार तास चालला.

Joint wheel cradle stuck: ११:०० च्या सुमारास एका-एका व्यक्तीस खाली उतरवण्यात सुरुवात 

पाळण्यात अडकलेले सर्व जण खाली येण्यासाठी वाट पाहत होते. आपण इतक्या उंचीवर येऊन अडकलो आहोत. या भीतीने चिंताग्रस्त होऊन हे लोक एकमेकांना धीर देत होते, तर खालूनही त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार त्यांना त्यांना हातवारे करून धीर देत होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या टर्न टेबल लॅडर गाडीने रात्री ११:०० च्या सुमारास एका-एका व्यक्तीस खाली उतरवण्यात सुरुवात करताच उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवल्या आणि प्रशासनासह सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Continues below advertisement

Joint wheel cradle stuck: तांत्रिक कारणाने हे गोलाकार चक्र वर जाऊन अडकले

उरुसानिमित्त दरवर्षी येथे लहान-मोठ्या आकाराचे पाळणे कागलमध्ये येतात. गेल्या एक-दोन वर्षांपासून हा जॉइंट व्हील नावाचा पाळणा या ठिकाणी येत आहे. यामध्ये वर्तुळाकारात समोर तोंड करून खुर्च्या आहेत, त्यावर लोकांना बसतात. हे वर्तुळाकार चक्र लोखंडी अँगल वरून सरकत वरती ऐंशी फुटांवर जाते व तेथे काही वेळ थांबूव फिरते, अशी याची रचना आहे. सायंकाळी ०७:०० वाजता हा पाळणा सुरू झाला. रात्री ०८:३० वाजेच्या सुमारास तांत्रिक कारणाने हे गोलाकार चक्र वर जाऊन अडकले. पाळणा चालकांनी तासभर प्रयत्न केला; पण यश आले नाही. शेवटी कोल्हापूरहून महापालिकेचे बचाव पथक बोलवून यात अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले.

 Joint wheel cradle stuck: 9 पुरुष, 5 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश

कोल्हापूरच्या कागलमध्ये गहिनीनाथ उरुसात जॉइंट व्हील पाळण्यात अडकलेल्या 18 नागरिकांची अखेर मध्यरात्री सुटका झाली. उरुसाच्या निमित्ताने दरवर्षी याठिकाणी मोठे मोठे पाळणे येतात. यावर्षी आलेल्या जॉईंट व्हील पाळण्यात 18 नागरिक बसले होते.हा पाळणा 80 फूट वर जाऊन गोलाकार फिरत असतो. मात्र काल रात्री हा पाळणा वर गेल्यानंतर अडकला. यामध्ये 9 पुरुष, 5 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश होता. पाळणा चालकाने एक तासभर पाळणा खाली घेण्यासाठी प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. वर अडकलेल्या नागरिकांना खालून त्यांचे नातेवाईक धीर देत होते. शेवटी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या गाडीने एक एक नागरिक खाली घेतला. त्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.