कोल्हापूर : कोल्हापूर मनपाच्या जाधववाडीमध्ये शाळेतील प्रार्थनेवरून पालकांनी चांगलाच गोंधळ घातला. या शाळेमध्ये घेत असलेल्या 'ए मत खहो खुदासे' प्रार्थनेवर पालकांनी आक्षेप घेत गोंधळ घातला. यानंतर शाळेसमोर मोठ्या प्रमाणात जमाव जमला. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. यावेळी मुलांना विविध प्रकारची शिक्षा देत असल्याचा पालकांनी आरोप केला. प्रार्थनेमध्ये उर्दू शब्द असल्याने पालकांकडून विरोध करण्यात आला.
शाळेमध्ये बांगड्या घालण्याला विरोध होत असल्याने काही पालकांनी विरोध केला. यावेळी आमच्या मुली बांगड्या घालणार असे काही पालकांनी सांगितले. शनिवारी टी शर्ट आणि स्कर्टला सुद्धा पालकांनी विरोध केला.
मतदानावेळी कोल्हापुरात शिरोलीमध्ये भगव्या टोपीवरुन वाद
दरम्यान, काल (21 नोव्हेंबर) भगवी टोपी घालून मतदानाला जाताना पोलिसांनी विरोध केला, असा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला. हा संपूर्ण प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावात घडला. यावरून शिरोली गावातील कन्या विद्या मंदिर या बूथवर सुमारे एक तास तणाव निर्माण झाला होता.
शिरोली जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिर या मतदान केंद्रांबाहेर हिंदुत्ववादी कार्यकर्ते उभे होते. यातील काही कार्यकर्ते इतरत्र फिरत असताना तर काही कार्यकर्ते भगवी टोपी घालून मतदानाला जाताना पोलिसांनी भगवी टोपी काढण्यास सांगितली. तसेच त्या टोपीवर कुठे पक्षाचे चिन्ह आहे का हे तपासून पाहिले. यावर हिंदूत्ववाती कार्यकर्त्यांनी पोलिसांचा निषेध केला. आमच्या टोप्या काढणार असाल तर इतर समाजाच्या सुद्धा टोप्या काढा असा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला. यातून जवळपास एक तास तणाव निर्माण झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या