कोल्हापूर : कोल्हापूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, करवीरचे आमदार पी.एन.पाटील यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. मंगळवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास डाॅक्टरांनी पी. एन. पाटील यांच्या प्रकृतीची पाहणी केल्यानंतर मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे.    सकाळी साडेदहा वाजता डॉक्टरांनी केलेल्या पाहणीनंतर स्पष्ट झाले. 


कार्यकर्त्यांकडून गावोगावी साकडे


दरम्यान, पाटील यांच्या प्रकृतीत फरक पडत नसल्याने कार्यकर्त्यांकडून गावोगावी देवाला साकडे घातले जात आहे. साहेबांना लवकर बर पडू दे, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. मंगळवारी मुंबईतील प्रख्यात मेंदू शल्यचिकित्सक डाॅ. सुहास बराले, राहुल पाटील यांनी अॅस्टर आधार रुग्णालयात आमदार पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाशी चर्चा केली. 


रविवारी सकाळी आमदार पाटील चक्कर येऊन बाथरूममध्ये पडल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. त्यांच्यावर रविवारी सायंकाळी तातडीने शास्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी 72 तासांचा अवधी काळजी करण्यासारखा असल्याचे सांगितले होते. त्यांची प्रकृती गंभीर असून कृत्रिम श्वासोच्छवास व संपूर्ण जीवरक्षक यंत्रणेसह त्यांच्यावर आवश्यक ते उपचार प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्याचे काम सुरू आहे.  दरम्यान, रुग्णालयात आमदार पाटील यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी तसे राहुल पाटील यांना धीर देण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची रिघ सुरुच आहे. 


शाहू छत्रपतींची दररोज रुग्णालयात फेरी 


दरम्यान, शाहू छत्रपती यांचीही अॅस्टर रुग्णालयात फेरी सुरु आहे. गेल्या तीन  दिवसांपासून ते डाॅक्टरांकडून उपचाराची माहिती घेत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या