कोल्हापूर : कोल्हापुरातील शिरोलीमध्ये अल्पवयीन प्रेमीयुगुलाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर स्टेटस ठेवत या प्रेमीयुगुलाने (Couple) गळफास घेऊन जीवन संपवलं. "ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायलाही तयार व्हा, अन्यथा प्रेम करु नका, प्रेम करताना जात धर्म बघू नका," अशा प्रकारचं स्टेटस ठेवत दोघांनीही आयुष्याची अखेर केली. या घटनेत आत्महत्या केलेला तरुण मुस्लीम (Muslim) तर युवती हिंदू (Hindu) आहे. आत्महत्या केलेला तरुण 18 वर्षांचा तर युवतीचं वय 16 वर्ष असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कुटुंबियांकडून दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध
हे दोघेही अल्पवयीन तरुण आणि तरुणी एकाच गल्लीत राहत असून गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते पण दोन्ही समाज वेगळे असल्याने या प्रेमसंबंधांना घरच्यांकडून विरोध होता. अनेक वेळा कुटुंबियांनी दोघांना परस्पर समजही दिली होती. मात्र आपल्या प्रेमाला विरोध असून आपला विवाह होणार नाही, या भावनेतून शुक्रवारी (01 ऑगस्ट) रात्री मुलगी बाहेर पडली. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. ती रात्री प्रियकर मुलाच्या घरी गेली आणि तिथेच दोघांनी घरातील लोखंडी पाईपला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात आणले असून नातेवाईकांची रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
एकतर्फी प्रेमात अपयश आल्याने चंदगडमधील तरुणाची आत्महत्या
एकतर्फी प्रेमात अपयश आल्याने 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात घडली होती. विठ्ठल रोंगाप्पा जाधव (वय 21, रा. मलगड) असं त्या तरुणाचं नाव होतं. ही घटना 23 ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. विठ्ठलचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून समुपदेशन केलं होतं. यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. "त्या मुलीने माझा केवळ वापर केला. निर्भया पथकाची भीती दाखवून त्यांनी माझ्याकडून तिला परत मेसेज न करण्याचे जबरदस्तीने लिहून घेतलं. तिला मी विसरु शकत नसल्याने शेवटचा हा पर्याय निवडला. आय एम सॉरी," असं त्याने चिठ्ठीत लिहिलं होतं.
हेही वाचा