Kolhapur municipal corporation elections 2022 : कोल्हापूर महानगरपालिकेची मुख्य इमारत ज्या प्रभागात येते तोच प्रभाग क्रमांक 10 आहे. हा प्रभागामध्ये समाविष्ठ झालेला भाग शहराच्या मध्यवर्ती परिसरात येतो. बाजारपेठ असल्याने होणारी गर्दी, दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते असेच चित्र या प्रभागात आहे.
प्रभाग क्रमांक 10 मध्ये समावेश असलेला भाग
पंचगंगा हॉस्पीटल, खोल खंडोबा मंदीर, बुरुड गल्ली, शनिवार पेठ पोस्ट ऑफीस, महानगरपालिका मुख्य इमारत, बाजार गेट, गंगावेश, धोत्री गल्ली, केएमसी कॉलेज, पाडळकर मार्केट, राष्ट्र स्थान शुक्रवारगेट पोलिस चौकी
प्रभाग 10 मध्ये आरक्षण
प्रभाग क्रमांक 10 मध्ये 10 अ सर्वसाधारण महिला 10 ब सर्वसाधारण आणि 10 क सर्वसाधारण गटासाठी आरक्षित आहे. त्यामुळे या प्रभागातून उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये चांगलीच चढाओढ आहे
प्रभागातील सद्यस्थिती काय
या प्रभागातून मागील वेळेस काँग्रेसच्या उमा बनसोडे यांनी विजय मिळवला होता. यावेळी त्यांचे पती उमा बनछोडे, शिवानंद बनछोडे, किरण शिराळे, अनिल पाटील, महेश कदम, लता कदम, विजय साळोखे, ऋतुराज क्षीरसागर, भरत काळे, निशिकांत मेथे, अभिजित सांगावकर आदी इच्छुक आहेत.
वाॅर्ड रचना कशी आहे ?
प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकूण 17 हजार 340 लोकसंख्या येते. यामध्ये अनुसूचित जाती 764, तर अनुसूचित जमातींची संख्या 57 आहे.
प्रभागमध्ये समाविष्ठ होणारा भाग
प्रभागाचा उत्तर भाग खालील प्रमाणे आहे
धनवडे गल्ली पूर्वेकडे पंचगंगा रोडने उत्तरेकडे पंचगंगा हॉस्पीटल पूर्वकडे परीट गल्ली दक्षिण पॅसेज पूर्वकडे जैन मंदीर मुख्य गेट समोरील दक्षिणेकडे शनि पॅसेजने पुर्वेकडे पदमाराजे शाळा दक्षिण पूर्व बाजूने साळी गल्ली शनिवार वाडा उत्तरबाजूने पदमाराजे गल्लीने सोन्यामाख्ती चौक ते दक्षिणेकडे गोसावी कॉम्प्लेक्स उत्तरेकडून पूर्वेकडे जाऊन टाऊन हॉल कंपड पश्चिम बाजू हददीने दक्षिणेकडे जाऊन गोसावी कॉम्लेक्स व शिवगंगा संकुल बांचे मधून पश्चिमेकडे मेन रोड पासून दक्षिणेकडे सरदार पॅसेजने भाऊसिंगजी रोडपर्यंत
प्रभागाचा पूर्व भाग खालील प्रमाणे आहे
भाऊसिंगजी रोडवरील सरदार पेसेज ते कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारत (माळकर तिकटी) पर्यंत
प्रभागाचा दक्षिण भाग खालील प्रमाणे आहे
माळकर तिकटी चौकापासून मुख्य रस्त्याने पान लाईन पापाची तिकटी तेथून दक्षिणेकडे जिरगे ऐसेजपर्यंत तेथून पश्चिमेकडील पैसेजने जैनमंदिर गेटपर्यंत तेथून उत्तरेकडे गंगावेश चौक तेचून पश्चिमेकडे पाडळकर मार्केट डॉ. ढवळे हॉस्पिटलचे दक्षिणेकडील पॅसेजपर्यंत
प्रभागाचा उत्तर भाग खालील प्रमाणे आहे
डॉ. ढवळे हॉस्पिटलचे पश्चिमबाजू पॅसेजने पाडळकर मार्केट उत्तर पूर्व कोपन्यातून धोत्री तालीम मंडळ चौक तेथून राजमाता जिजामाता प्रवेशद्वार (केएमसी कॉलेज तेथून पश्चिमेकडे गाणार्थ इस्टेट अपार्टमेंटपर्यंत तेवून उत्तरेकडे भाषिका विटोया मंदिर चौक ते राहूल जाधव बिल्डींग उत्तरेश्वर रोड पश्चिमेस उत्तरेश्वर महादेव -मोदर रोडने बेलवलकर व प्रसार यांचेमधील पॅसेजने उत्तरेकडे धनवडे गल्ली चौकापर्यंत.
राजकीय बलाबल
कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये हा प्रभाग येतो. या प्रभागातील माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचा प्रभाव आहे. 2015 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमा बनसोडे यांनी राष्ट्रवादीच्या सुवर्णा सांगावकर यांचा पराभव केला होता.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस |