कोल्हापूर :कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur News) घरगुती गणेश विसर्जन पार पडल्याने देखावे पाहण्यासाठी (Kolhapur Ganesh Darshan) आजपासून (ता. 24 सप्टेंबर) गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कोल्हापूर शहरात वाहतूक मार्गात बदल केले आहेत. मंडळांसमोर देखावा पाहण्यासाठी कार जाणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पार्किंग आणि केएमटी वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत. हा बदल पुढील चार दिवसांसाठी असेल. 

Continues below advertisement

पुढील चार दिवस वाहतूक मार्गात बदल 

कोल्हापुरात सणावर नसला, तरी अशीही मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे शहरातील मंडळांचे देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन परिसरनिहाय पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कार मंडळापर्यंत नेता येणार नाही. आजपासून केलेला बदल 28 सप्टेंबरपर्यंत राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली आहे. 

या ठिकाणी करता येईल पार्किंग 

बिंदू चौक मनपा पार्किंग, प्राथमिक शाळा क्र. ९ राजारामपुरी, मेन राजाराम हायस्कूल मैदान, शिवाजी स्टेडियम, पेटाळा हायस्कूल, व्ही. टी. पाटील भवन, दसरा चौक, शहाजी कॉलेजचे मैदान, प्रायव्हेट हायस्कूल मैदान, गांधी मैदान, कमला कॉलेज, व्हिनस कॉर्नर गाडी अड्डा, शहाजी लॉ कॉलेजच्या बाजूस स्टेट बँकेसमोर, 100 फुटी रस्ता, शाहू मिलसमोरील रिकामी जागा.

Continues below advertisement

अवजड वाहनांना रिंगरोड 

दरम्यान, सर्व अवजड वाहने गणेशोत्सव काळामध्ये शहरातील बाह्य रिंगरोडवरून पुढे जातील. बिनखांबी गणेश मंदिरकडून निवृत्ती चौकाकडे जाणाऱ्या सर्व मोटार वाहनांना बिनखांबी गणेश मंदिर या ठिकाणी प्रवेश बंद असेल. गांधी मैदानकडून खरी कॉर्नरकडे जाणाऱ्या सर्व मोटार वाहनांना गांधी मैदान मेनगेट या ठिकाणी प्रवेश बंद आहे. तेथील वाहने महाराष्ट्र हायस्कूलमार्गे पुढे मार्गस्थ होतील. मिरजकर तिकटी व गांधी मैदानकडून खरी कॉर्नरमार्गे नाथागोळे तालीमकडे जाणाऱ्या मोटारींना खरी कॉर्नरजवळ प्रवेश बंद असेल. ही वाहने गांधी मैदानमार्गे पुढे मार्गस्थ होतील.

इतर महत्वाच्या बातम्या