Kolhapur District Gram Panchayat Election Result Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिकवर

Kolhapur Gram Panchayat Election Results 2022 Live Updates : कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी आठपासून सुरु झाली आहे.

परशराम पाटील, एबीपी माझा Last Updated: 20 Dec 2022 05:01 PM

पार्श्वभूमी

Kolhapur District Gram Panchayat Election : गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या गावगाड्यावर आज गुलालाची उधळण होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सकाळी आठपासून सुरु झाली आहे. सकाळी साडेआठच्या...More

कागल तालुक्यातील 26 पैकी 15 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर

कागल तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत 15 गावात सतांतर तर 11 ठिकाणी सत्ता कायम राहिली. आमदार हसन मुश्रीफ गटाचे 7, खासदार संजय मंडलिक गटाचे 7, समरजितसिंह घाटगे गटाचे 6, माजी आमदार संजय घाटगे गटाचे 4 तर प्रविणसिंह पाटील गटाचे 2 ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले.