कोल्हापूर : डोक्यात दांडके घालून फरार झालेल्या तरुणाला तब्बल 13 दिवसांनी अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात माझ्या बायकोकडं सारखं का बघतोस? तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून डोक्यात लाकडाने वार केल्याने उत्तम भरमू नाईक (वय 50) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर सचिन भिमराव नाईक (वय 36) हा फरार झाला होता. हल्ला करून फरार झालेल्या तरूणाला तब्बल 13 दिवसांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत. सचिनविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लिंगनूर पोलिस चौकीजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी केल्यानंतर  त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान,  मिळालेल्या उत्तमने पोलिसांनी अवैध दारु व्यवसायाची टीप दिल्यानेच कृत्य केल्याची चर्चा रंगली आहे. 


लाकडी दांडक्याने डोक्यावर जोरात प्रहार 


दरम्यान, पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार बिद्रेवाडीमध्ये उत्तम नाईक व सचिन नाईक हे दोघेही शेजारी आहेत. रविवारी (7 जानेवारी) एकमेकांच्या शेजारी असून जेवून झाल्यानंतर बसले होते. यावेळी सचिनने उत्तमला ‘तू माझ्या बायकोकडे सारखे का बघतोस? अशी विचारणा करत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर झालेल्या वादात लाकडी दांडक्याने डोक्यावर जोरात प्रहार केला. गंभीर जखमी झाल्याने उत्तम यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच उत्तम यांचा मृत्यू झाला. मारहाण केल्यानंतर सचिन फरार झाला होता.


भांडताना प्रेयसीचा गळा दाबल्याने मृत्यू 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी इचलकरंजीमध्ये प्रियकराने भांडणात गळा दाबल्यानंतर जखमी झालेल्या प्रेयसीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सुरेखा राजू सोलनकर (वय 33, रा. चिपरी) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हेगार सचिन गौतम माने (रा. इंदिरानगर झोपडपट्टी सांगली) याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रेयसी व प्रियकर दोघेही मूळचे सांगलीचे आहेत. दोघांचे गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांच्यात नेहमी किरकोळ कारणावरून भांडणं व्हायची. सचिन सुरेखाला यांना मारहाण करीत होता. अशाच भांडणात सचिनने सुरेखाला मारहाण केली व गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरेखा बेशुद्ध पडल्याने पळून गेला. यावेळी एकाने पाहिल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. जखमी सुरेखाला पहिल्यांदा आयजीएममध्ये आणि नंतर पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. तिथं उपचारादरम्यान सुरेखाचा मृत्यू झाला.


इतर महत्वाच्या बातम्या