पन्हाळा (जि. कोल्हापूर) : सोशल मीडियातील विखार कुठंपर्यंत येऊन पोहोचला आहे याचा प्रत्यय दररोज येत असतानाच आता त्यावर कडी होईल, असा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मानेवाडीत घडला. कुत्र्याचा स्टेट्स ठेवल्याने मारामारी झाल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे मारामारी करणारे एकमेकांचे नातेवाईक आहेत. पोलिसांनी तरुणीने फिर्याद दिल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पन्हाळा पोलिस ठाण्यात नंदकुमार शिवाजी जाधव, पृथ्वीराज नंदकुमार जाधव व अभिषेक आनंदा जाधव (तिघेही रा.कोतोलीपैकी मानेवाडी, ता.पन्हाळा) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रकार नेमका काय घडला? 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोतोलीपैकी मानेवाडीत फिर्यादी व संशयित आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. मोबाईलवरील कुत्र्याच्या स्टेटस्‌वरून फिर्यादी आणि संशियतांमध्ये गैरसमज निर्माण झाला. यानंतर संशयितांनी फिर्यादीच्या भावाला मारहाण केली. या मारहाणीनंतर जाब विचारायला गेलेल्या फिर्यादी तरुणीला तिच्या भावाला व आईला संशयितांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये फिर्यादी तरुणीसह तिचे भाऊ व आई जखमी झाले आहेत.  


मारहाणप्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल


दरम्यान, नात कोठे आहे, अशी विचारणा करून आजीस मारहाण केल्याप्रकरणी तीन महिलांवर कोल्हापुरात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. संगीता सुनील फडतारे (रा. शहाजी वसाहत, शिवाजी पेठ परिसर), कमल नलवडे आणि सुवर्णा जाधव अशी त्यांची नावे असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांनी दिली. यादवनगरात दौलतबी बागवान (वय 70) या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या घरात घुसून तिघींनी तुमची नात कोठे आहे, अशी विचारणा केली. यावेळी बागवान यांना मारहाण केली. 10 जून2023 रोजी ही घटना घडली होती. याची फिर्याद त्यांनी शुक्रवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या