कोल्हापूर: शहरातील सायबर चौकात एक भीषण अपघात (Kolhapur Siber Chowk Accident) झाला असून भरधाव कारने चौघांना चिरडल्याची घटना घडली. यापैकी तीन जण गंभीर जखमी आहेत तर दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
सायबर चौकात एक भरधाव कार आली आणि तिने समोरच्या टूव्हीलर गाड्यांना धडक दिली. त्यामध्ये काही लोक हे हवेत उडाल्याचं दिसून आलं. हा अपघात इतका भयानक होता की पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सीटी हॉस्पिटल आणि सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भरदिवसा भरधाव वेगाने गाडी
कोल्हापुरातील सायबर चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. राजारामपुरी आणि शिवाजी विद्यापीठ, राजाराम कॉलेजला जोडणाऱ्या या चौकात दिवसा मोठी गर्दी असते. तसेच या चौकाच्या बाजूला अनेक शाळा तसचे सायबर कॉलेजही आहे. अशात राजारामपुरीकडून आलेल्या एका भरधाव कारने अनेकांना धडक दिली. त्यापैकी टू व्हीलरवरील दोन-तीन जण तर हवेत उडाल्याचं दिसून आलं. तर ही कार पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला आदळली.
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यामध्ये या चौकात इतर वाहने ही हळूहळू पुढे जाताना दिसत आहेत. तर ही एकच कार भरधाव वेगाने आली आणि तिने अनेकांना उडवलं. कोल्हापुरातील या घटनेमध्ये दोघांचा जागेवरच जीव गेला असून इतर तीन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा: