KDCC ED Raid : माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष (Hasan Mushrif ED Raid) असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाहूपुरीमधील मुख्यालयासह सेनापती कापशी येथील जिल्हा बँक शाखा तसेच हरळी येथील कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेवर ईडीने छापेमारी केली. ईडीच्या पथकाने तब्बल 30 तास छप्पेमारी करत बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा बँकेतील कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज (3 फेब्रुवारी) सकाळी एक तास कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत ईडीच्या कारवाईचा निषेध केला. दुसरीकडे, गुरुवारी सायंकाळी सुद्धा अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजल्यानंतर कर्मचारी आक्रमक झाले होते. त्यामुळे आजही त्याचे पडसाद उमटले. 


'ईडी'विरोधात कर्मचारी आक्रमक 


दरम्यान, गुरुवारी कोल्हापुरात मुख्य बँक शाखेच्या प्रांगणात कर्मचाऱ्यांनी एकत्रित जमताना जोरदार घोषणाबाजी केली. ईडीकडून समन्स बजावण्यात आलं असलं, तरी शुक्रवारी हजर करु अशी विनंती कर्मचाऱ्यांनी केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आल्याने कर्मचारी आक्रमक झाले होते. निषेधाच्या घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. 30 तासांपासून बँकेमध्ये कारवाई सुरुच असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता होती. गुरुवारी सकाळपासून आपापले विभाग सोडायचे नाहीत असे आदेश देण्यात आले होते. चारच्या सुमारास सर्व कर्मचाऱ्यांना बँकेतून खाली पाठवल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजताच कर्मचारी आक्रमक झाले. 


30-30 तास चौकशी केल्याने अधिकारी तणावाखाली आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला काही झाल्यास सर्वस्वी ईडी जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला होता. 


पाच अधिकारी ताब्यात 


ईडीने 30 तास छापेमारी करताना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (KDCC ED raid) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले. ईडीने तब्बल 30 तास ब्रिक्स व संताजी घोरपडे साखर कारखान्याची संबंधित सर्व व्यवहारांची कसून चौकशी केली. गुरुवारी सायंकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर आणि राजू खाडे यांना समाज बजावून ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. 


दरम्यान, सरसेनापती संताजी घोरपडे, ब्रिक्स, बिद्री व भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारांबाबत चौकशी झाल्याची माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्ज प्रकरणाबाबत माहिती घेऊन चौकशी करण्यात आली. कापशी शाखेतील सर्व शेतकरी ठेव पावत्यांची झेरॉक्स प्रत घेतल्याची माहिती आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या