Sangli News : मिरजेत (Miraj) आर्यन हार्ट केअर मिरज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांगली सायक्लोथॉन 2023 सायकल स्पर्धा दिमाखदार पद्धतीने संपन्न झाली. राज्यातील व राज्य बाहेरील जवळपास बाराशे स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. सिद्धेश पाटील, हेमंत लोहार, बलैया हिरेमठ, पृथ्वीराज दत्तात्रय, साक्षी पाटील, प्राजक्ता सूर्यवंशी, श्रावणी घोडेश्वर, साक्षी दोशी, श्रावणी चव्हाण, पूर्वा माने, किरण बंडगर, साजिद सय्यद, विनायक सूर्यवंशी, यांनी वेगवेगळ्या विभागात यशस्वीरित्या पारितोषिके पटकावले. सांगली जिल्ह्यातील (Sangli News) सर्व सायकल अकॅडमी आणि सायकल ग्रुप यांच्या मदतीने ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा मार्गावर स्पर्धकांसाठी पुरवण्यात आलेली सुविधा, एनर्जी स्टॉल्स, वैद्यकीय सेवा, मोफत ईसीजी तपासणी, टेक्निकल सपोर्ट व शिस्तबद्ध आयोजन या ठळक वैशिष्ट्यांमुळे स्पर्धा ऐतिहासिक ठरली. 


जिल्ह्यात प्रथमच भव्य स्पर्धा


स्पर्धा चार विभागात विभागली गेली होती. पाच किलोमीटर, 20 किलोमीटर, 50 किलोमीटर आणि 100 किलोमीटर.  स्पर्धेसाठी दोन मार्ग निश्चित करण्यात आले होते. पाच आणि 20 किमीसाठी मिरज-सांगली-मिरज हा मार्ग ठेवण्यात आला होता. 50 आणि 100 किलोमीटरसाठी राष्ट्रीय महामार्ग हा ठेवण्यात आला होता. स्पर्धेची सुरुवात आणि समाप्ती न्यू इंग्लिश स्कूल मिरज या ठिकाणी ठेवण्यात आली होती. सकाळी सहा वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरुपात सायकल स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन आर्यन हार्ट केअर मिरज या संस्थेकडून करण्यात आले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात आले. 


त्याचबरोबर आयुक्त सुनील पवार, जनसुराज पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, नगरसेवक निरंजन आवटी, उपायुक्त स्मृती पाटील मॅडम, उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे, दिलीप बिल्डकॉनचे मनीष दीक्षित, निशिकांत तिवारी, न्यू इंग्लिश स्कूलचे दिग्विजय चव्हाण, व अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, डॉक्टर रियाज मुजावर, डॉ विनोद परामशेट्टी, डॉ शबाना मुजावर, अतिष अग्रवाल, डॉ विकास पाटील, उस्मान बांदार, विवेक शेटे, उस्मान उगारे, अरुण लोंढे, जिल्हा केमिस्ट असोशिएशन चे अध्यक्ष विशाल दुर्गाडे, गणेश कोळसे, अरुण कोरे, तौफिक मुजावर, विनायक निटवे, अमित सोनवणे, किरण साहू आणि सर्व इतर सदस्यांनी संयोजन केले. 


इतर महत्वाच्या बातम्या