Kolhapur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत घरोबा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक समीकरण बदलली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कट्टर विरोधक महाडिक गट आणि मंडलिक गट एकत्र आला आहे. खासदार संजय मंडलिक (sanjay mandlik) यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडताना कट्टर विरोधक खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा केली होती, अशी माहिती धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली.


ज्या माजी मंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी मंडलिकांना निवडून आणले त्यांनाही हा धक्का होता. मात्र, मंडलिकांनी व्यवस्थित फिल्डिंग लावून निर्णय घेतला होता. प्रवेश करण्याआधी त्यांनी देवेंद्र फडणवीस आपल्याशी  चर्चा केली असल्याची माहिती स्वतः धनंजय महाडिक यांनी दिली. यापुढच्या काळात मंडलिक गटाशी आघाडी होऊ शकते असही सूचक वक्तव्य त्यानी केले.


आमचं ठरलंय अस म्हणत राज्यात महाविकास आघाडी होण्याअगोदर कोल्हापूरमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले. या सगळ्या राजकारणामध्ये 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा मोठा पराभव झाला. त्यानंतर मंडलिक- महाडिक वाद गाजत होता. या दोन्ही शक्तीचा कोल्हापूरमध्ये मोठा प्रभाव आहे.


निवडणुकीनंतर धनंजय महाडिक यांनी भाजपशी घरोबा केला. त्यांना अनपेक्षितपणे राज्यसभेवर संधी मिळाली. त्यामुळे भाजपा - शिंदे युतीपुढं कोल्हापूरचा लोकसभेचा उमेदवार कोण? हा प्रश्न निर्माण झाला होता. सुरवातीला उध्दव ठाकरे यांची बाजू घेणाऱ्या संजय मंडलिक यांनी यू टर्न घेत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.


इतर महत्त्वाच्या बातम्या