कोल्हापूर : जेव्हा कुंपणच शेत खाते असा प्रकार कोल्हापूर शासकीय इमारतीमध्ये आला आहे. कोल्हापूर पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरनेच शासकीय इमारतीमधील महिलांमध्ये दहशत निर्माण करून गेटची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे तोडफोड करणारा गुरुनाथ कुंभार असून तो वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर आहे. मस्तवालपणे तो वागत असूनही आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा मस्तवालांना नेमकं कोण अभय देत आहे अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. इमारतीमधील महिलांनी तक्रार करूनही कारवाई करण्यात आलेली नाही. नुकसानीचा रितसर पंचनामा करून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई आपल्या विभागाकडून करणेत यावी व त्याची बदली तात्काळ करणेत यावी व आम्हांला त्याच्यापासून वाचवावे ही विनंती, असेही तक्रारीमध्ये म्हटले आहे. 


संबंधित मानसिंगवर कारवाई करण्यात यावी यासाठी अधीक्षक अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे मंडळ आणि उपकार्यकारी अभियंता, दुधगंगा कालवे विभाग क्रमांक 1 कोल्हापूर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, अजूनही त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. 


मी कोणाकडे काम करतो माहित आहे का?


तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, 24 नोव्हेंबर रोजी गुरूनाथ कुंभार हा व्यक्ती वर नमूद इमारतीत राहणाऱ्या महिलांना धमकावून हातात लोखंडी रॉड घेवून इमारतीच्या मेन गेट जवळ आला. त्यावेळी सौ. शीतल पवार या पोर्चमधील फरशी पुसत होत्या. सदर व्यक्ती जवळ येवून त्यांना बोलला की, "हे गेट कोणी लावले, हे कायमचे उघडेच ठेवायचे नाहीतर मी कोणाकडे काम करतो माहित आहे का? त्यावेळी पवार यांनी त्याला सांगितले की, आम्ही हे अर्धे गेट भटकी कुत्रे, विक्रेते व कॉलनीत येणाऱ्या इतर व्यक्ती पासून सुरक्षा म्हणून लावत असतो बाकी कोणता विषय नाही. त्यावेळी तो हातातील रॉड घेवून त्यांच्या अंगावर धावला व त्यांना शिवीगाळ केली. 


त्यानंतर आम्ही घाबरून आत पळालो व त्यानंतर आवाज येवू लागल्याने आम्ही दरवाजा उघडून बघितले असता तो व्यक्ती सरकारी इमारतीचे गेट जोर जोरात लोखंडी रॉडने तोडत होता. त्यावेळी आम्ही त्याचे व्हीडोओ चित्रण मोबाईल वर केले. यावेळी पवार यांना त्याने मारण्याचा व धमकावण्याचा प्रयत्न केल्याने त्या खूप घाबरल्या. त्यानंतर त्यांचे पती आल्यावर पवार व त्यांचे पती यांनी रितसर तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या