Shahuwadi : पाणीदार जिल्हा म्हणून परिचित असलेल्या कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील शाहूवाडी (Shahuwadi News) या तालुक्याच्या गावीच पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट (Shahuwadi water crisis) आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात पायपीठ करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. गेल्या 10 दिवसांपासून पाणी नसल्याने पुरता बोजवारा उडाला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांवर टँकरने पाणी घेण्याची वेळ आली आहे. तब्बल साडे तीनशे रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत टँकरसाठी मोजावे लागत आहे. पाणी मिळत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


शाहूवाडी (Shahuwadi) तालुका दुर्गम आणि विकासाच्या बाबतीत कोसो दूर असलेल्या तालुका समजला जातो. त्यामुळे तालुक्याचे गाव असूनही पायाभूत सुविधांची वाणवा आहे. त्यामुळे नागरिकांना शेकडो समस्यांना सामोरं जावं लागत आहे. सध्या गावासाठी पाणीपुरवठा (Shahuwadi water crisis) करणारी शाळी नदीवरील कोळगांव हद्दीतील व आंबर्डी नदीवरील नळपाणी योजना गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी अपुरी पडत आहे. त्यामूळे संपूर्ण गावात एका दिवसाआड अपुरा पाणी पुरवठा सुरु आहे. गेल्या 10 दिवसांपासून तो सुद्धा बंद झाला आहे. त्यामुळे पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीवरही बहिष्कार


गेल्या अनेक वर्षांपासून शाहूवाडी ग्रामस्थांनी विविध माध्यमातून शाहूवाडी नगरपंचायत करावी या मागणीसाठी लक्ष वेधले आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला होता. राज्य सरकारकडून तालुका ठिकाणच्या गावांना नगरपंचायत देण्याचा निर्णय आठ वर्षांपूर्वी घेतला होता. त्या निर्णयाने शाहूवाडी गावाला नगरपंचायत मंजूर असूनही कार्यवाही झालेली नाही. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. 


दरम्यान, शाहूवाडी ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेनंतर खासदार धैर्यशील माने (dhairyasheel mane on shahuwadi) यांनी आपण यासाठी पाठपुरावा करत असून यश नक्की येईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. शाहूवाडीला नक्की नगरपंचायत होईल, आचारसंहितेमुळे राज्य सरकारला निर्णय घेण्यास अडचण येत आहे. येणाऱ्या काळात शाहूवाडीकरांच्या मनासारखा निर्णय झालेला असेल असेही म्हटले होते. मात्र, या घोषणेनंतर अडीच महिन्यांनंतरही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या